spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

HomeUncategorizedआरोग्यासाठी हसा

आरोग्यासाठी हसा

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

प्रत्येकाने दररोज खळखळून हसायलाच पाहिजे. मात्र कधी हसायला येईल हे सांगता येत नाही. विनोद वाचल्यावर, विनोद पाहिल्यावर आणि विनोद ऐकल्यावर हसायला येते.  याशिवाय आपण दररोज हसत असतो. मात्र खळखळून हसतोच असे नाही. अशा हसण्याचे नेमके कारण सांगता येत नाही. असे हसू कधी येईल हे सांगता येत नाही. एका शब्दानेही माणूस हसू शकतो. उदाहरणार्थ मराठी बोलणाऱ्या माणसाने संधी साधून अफकोर्स [अर्थातच] हा शब्द  नेमक्यावेळी वारंवार उच्चारला तरी हलकासा विनोद होतो. अशा अनेक शब्दांमुळे प्रसंगानुरूप विनोद होतात. वेगळ्या हवभावामुळे, वेगळ्या हालचालीमुळे विनोद होतात.आपल्या ग्रुपमध्ये एखाद्या विनोदी स्वभावाचा असायला हवा म्हणजे सहज आणि वारंवार हसायला येते. 

काहीही झाले तरी आपल्याला आपल्या आरोग्यासाठी हसायलाच हवे. हसण्यामुळे अनेक लाभ होतात :

  • हसण्यामुळे तणाव आणि चिंता दूर होते.
  • हसणे हे एक उत्तम वेदनाशामक आहेत. 
  • दिवसातून १५  मिनिटे हसण्याने ४० कॅलरिज बर्न होतात.
  • शारीरिक, मानसिक वेदना कमी होऊन आरोग्य सुधारते.
  • चेहऱ्यावरील स्नायूंची हालचाल सुधारते,चेहऱ्यावरील स्नायू तंतूचा विस्तार होतो. 
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
  • हसन तरुण, आकर्षक आणि विश्वासार्ह्य बनवते. 
  • जीवनात सकारात्मक भावना निर्माण होतात. 
  • पित्त, मळमळ नाहीसे होते, दिवसभर प्रसन्न  वाटते.
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments