प्रसारमाध्यम डेस्क
पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेंतर्गत विमाधारकाचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला २ लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी वर्षाला या विम्यासाठी फक्त ४३६ रुपये भरावे लागणार आहेत. प्रत्येक वर्षाच्या १५ ते ३० मे या तारखे दरम्यान बँक खत्यातून हा हप्ता विमा योजनेवर वर्ग करण्यात येणार आहे. यासाठी खातेदारच्या खात्यावर ४३६ रुपये रक्कम ठेवणे गरजेचे आहे.
या विमा योजनेत विमाधारकाचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीचे वय १८ ते ५० या वयोगटातील असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीचे बँकेत खाते असावे लागणार आहे. जे विमाधारक ५० वर्षे वयाच्या अगोदरपासूनच योजनेत सहभागी आहेत, त्यांना त्यांच्या वयाच्या ५५ वर्षापर्यंत जोखीम संरक्षण मिळणार आहे. यानंतर ते आपोआपच योजनेतून बाहेर पडले जातील.
या योजनेंतर्गत विमाधारकाच्या बँक खत्यातून प्रत्येक वर्षाला आपोपम ४३६ रुपये विमा खात्यावर ऑटो डेबिट होतील म्हणजेच वर्ग होतील. ऑटो डेबिटही प्रणाली असल्यामुळे विमाधारकाच्या बँक खात्यावर तेवढी रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही बँकेत बँक बचत खातं असलं तरी चालेल. एकाच व्यक्तीची अनेक बँकेत खाती असतात त्यातील कोणत्याही एक बँकेतील खाते या योजनेसाठी वापरात आळणे तरी चालते यासाठी त्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल.



