प्रसारमाध्यम : अमोल शिंगे
गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे सत्तारूढ गटाला जोरदार धक्का बसला आहे. अरुण डोंगळे यांनी घेतलेल्या या भुमिकेवर मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील काय निर्णय घेणार याकडे कोल्हापूर जिल्हयाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
चार वर्षांपूर्वी झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी सध्याचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके आणि माजी खासदार संजय मंडलिक यांना सोबत घेऊन माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या गोकुळ दूध संघावर असणाऱ्या वर्चस्वाला धक्का देत सत्तांतर घडवून आणले होते. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या गटातून बाहेर बाहेर पडलेले अरुण डोंगरे आणि विश्वास पाटील यांना दोन दोन वर्षांचे अध्यक्षपद द्यायचे ठरले होते. यानुसार विद्यामान अध्यक्ष अरुण डोंगळे यांची २५ मे रोजी अध्यक्ष पदाची मुदत संपत आहे. म्हणून मंत्री हसन मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते मात्र त्यांनी आज हा राजीनामा देण्यासाठी नकार दिला आहे. अरुण डोंगळे यांच्या या नकारामुळे गोकुळच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अध्यक्षपद मिळाल्यानंतर अरुण डोंगळे हे महायुतीतील शिंदे गटात सहभागी झाले होते.
२०२१ मध्ये महाविकस आघाडीचे सरकार असतानाच गोकुळ मध्ये सत्तांतर झाले होते. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी सध्याचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके आणि माजी खासदार संजय मंडलिक यांना बरोबर घेऊन गोकुळची सत्ता काबिज केली होती पण २०२२ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर गोकुळ दूध संघातील पण समीकरणे बदलली गेली.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री पालकमंत्री प्रकाश अबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक आणि अरुण डोंगर हे महायुतीतील शिंदे गटात सहभागी आहेत. आमदार विनय कोरे हे भाजपचे मित्र पक्ष म्हणून काम करत आहेत तर मंत्री हसन मुश्रीफ हे देखील महायुतीच्या अजित पवार गटात आहेत. या बदलेल्या समिकरणामुळेच हा अध्यक्षपदाच्या तिढा निर्माण झाला आहे. यात खरी अडचण निर्माण होणार आहे ती मंत्री हसन मुश्रीफ यांची. गोकुळच्या राजकारणात आमदार सतेज पाटील यांच्याशी असणारी मैत्री पण जपायची आहे आणि राज्याच्या सत्तेत सहभागी असल्याने महायुतीचा धर्म पण पळायचा आहे. या परिस्थितीत मंत्री हसन मुश्रीफ काय भूमिका घेणार त्याकडे कोल्हापूर जिल्हयाबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
गोकुळ दूध संघातील सध्याचं बलाबल
महायुती : अरुण डोंगळे, अजित नरके, शौमिका महाडीक, अंबरीष घाडगे, एस. आर. पाटील, अभिजीत तायशेटे,नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड आणि अमरसिंह पाटील.
महाविकस आघाडी : विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, शशिकांत पाटील (चुयेकर ), डॉ. चेतन नरके, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर.
मंत्री हसन मुश्रीफगट : नाविद मुश्रीफ, प्रा. किसान चौगले, रणजितसिंह पाटील.



