कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शेती, पर्यावरण आणि समाज यांच्यातील सुसंवाद घडवणारा आणि नव्या विचारांची दिशा देणारा नाॅलेज टुरिझमच्या मिडिया इनक्युबेटर उपक्रमांतर्गत एक प्रेरणादायी कार्यक्रम ‘चला बोलूया’ शुक्रवारी ( ता.१६ ) रोजी संध्याकाळी ६:३० वाजता राजारामपुरी येथील प्रसारमाध्यम कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमामध्ये कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक संजय देसाई (M.Sc. Agriculture) यांच्याशी ‘चला बोलूया’ अंतर्गत “जमिनीचं आरोग्य – एक अभ्यास” या विषयावर हा विशेष संवाद साधण्यात येणार असून, जमिनीच्या आरोग्यावर आधारित त्यांच्या संशोधनाचा व अनुभवाचा अभ्यास रसिकांसमोर मांडला जाणार आहे.
आजच्या काळात अन्न सुरक्षा, उत्पादन क्षमता आणि पर्यावरणाचे संवर्धन या सर्व गोष्टींसाठी जमिनीची सुपीकता व आरोग्य अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाद्वारे शेतकरी, तरुण अभ्यासक व पर्यावरणप्रेमींना शाश्वत शेतीच्या दिशेने विचार करायला उद्युक्त करणारा संदेश दिला जाणार आहे.
तरुण, अभ्यासक, शेतकरी आणि पर्यावरण विषयात रस असलेल्या प्रत्येकासाठी ही एक प्रेरणादायी संधी आहे. जमिनीच्या प्रकृतीचा विज्ञानाधारित विचार, नैसर्गिक सुधारणा आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व या मुद्द्यांवर प्रकाश टाकला जाणार आहे.
लक्षात ठेवा – माहिती हीच नवी क्रांती ! हा कार्यक्रम पाहायला / ऐकायला विसरू नका !
- कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे.
- पहिला भाग : ‘चला बोलूया'”जमिनीचं आरोग्य – एक अभ्यास”
विशेष संवाद कृषि अभ्यासक संजय देसाई (M.Sc. Agriculture) यांच्यासोबत. - तारीख : १६ मे २०२५
- वेळ : संध्याकाळी ६:३० वाजता
- ठिकाण : प्रसारमाध्यम, मुख्य कार्यालय, सारस्वत बँकेच्या वर, दुसरा मजला, राजारामपुरी सातवी गल्ली, कोल्हापूर
—————————————————————————————-