रसाळ, सौम्य स्वादाचे खरबूज

0
133
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

खरबूज आणि टरबूज या दोन्ही फळातील गुणधर्मात खूप साम्य आहे. रंगात फक्त फरक आहे. दोनही फळे गारवा देणारी आहेत. दोन्ही फळे उन्हाळ्यात बाजारात येतात. मात्र यापैकी टरबूज हे फळ कलिंगड या नावाने सर्वाधिक लोकप्रिय आहे. कलिंगडचे चाहते बहुसंख्य आहेत. त्यामानाने खरबूज कमी लोकांना माहित आहे.

खरबूजचे वैशिष्ट्ये: खरबूजाचे साल जरा खरडे असते, पिवळसर/हिरवट रंगाचे असते. त्याच्या आतमध्ये नारिंगी किंवा फिकट पिवळसर गर असतो. गर गोडसर, रसाळ सौम्य स्वादाचा असतो. याला ‘किरणी’, ‘खरबुज’, ‘सुफेदा’ असेही स्थानिक नावाने ओळखले जाते.

पोषणमूल्य (१०० ग्रॅम मध्ये): कॅलरीज – ३४, पाणी – ८९ टक्के, फायबर्स – ०.९ ग्रॅम, जीवनसत्त्व ए, सी भरपूर, पोटॅशियम, फॉस्फरस, फोलेट

उपयोग: थंड पेय, फ्रुट सॅलड, साखर घालून खाण्यास उपयुक्त,  उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते. ए आणि सी जीवनसत्वामुळे  त्वचेसाठी उपयुक्त.

खरबूज पिकाची लागवड डिसेंबर ते जानेवारी महिन्यात केली जाते. मार्च-एप्रिल महिन्यात हे फळ तयार होते.  फळे पोसत असताना पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते, अन्यथा फळे फुटू शकतात.

खरबूज हे पिक महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडु या राज्यांमध्ये घेतले जाते. महाराष्ट्रात हे पिक विशेषतः नाशिक, सोलापूर, अहमदनगर, बीड आणि औरंगाबाद भागांत मोठ्या प्रमाणात घेतले जाते.


  • 🔄 खरबूज टरबूज यातील मुख्य फरक:

    घटक खरबूज टरबूज
    गराचा रंग नारिंगी/पिवळसर लालसर
    बी लहान अनेक मोठ्या काळ्या/पांढऱ्या बीया
    स्वाद सौम्य गोड गोडसर रसाळ
    पाण्याचे प्रमाण ~८९% ~९२%
    थंडावा सौम्य अधिक
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here