कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सीबीएसई बोर्डाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. यावर्षी ८८.३९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विजयवाडा विभागात सर्वाधिक म्हणजे ९९.६० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. विद्यार्थी त्यांचे निकाल सीबीएसईच्या वेबसाईटवर (cbse.gov.in) किंवा SMS द्वारे पाहू शकतात.
देशभरातील ७ हजार ३३० परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा झाली. यावर्षी एकूण ८८.३९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ०.४१ टक्क्यांनी निकाल वाढला आहे. गेल्या वर्षी ८७.९८ टक्के विद्यार्थी पास झाले होते. २०२५ मध्ये १७ लाख ४ हजार ३६७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख ९२ हजार ७९४ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी १४ लाख ९६ हजार ३०७ विद्यार्थी पास झाले आहेत.






