कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
लीची हे चवदार, पोषणमूल्यांनी भरलेले आणि अनेक आरोग्यदायी गुणधर्म असलेले फळ आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे सेवन केल्यास ते आरोग्यास फायदेशीर ठरते. लीची फळ भारतात मुख्यतः मे ते जून या कालावधीत बाजारात उपलब्ध असते.
लीची हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे. हे फळ मुख्यतः भारत, चीन, थायलंड, नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये पिकवले जाते. भारतात बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांमध्ये लीचीची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. महाराष्ट्रात लीचीचे उत्पादन तुलनेने कमी आहे, परंतु मे महिन्याच्या सुरुवातीपासून जूनच्या शेवटपर्यंत लीची बाजारात उपलब्ध असते. मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्ये बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर भारतातील लीची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते.
लीचीचे फळ लहान, गोलसर किंवा थोडे लांबट असते. फळाच्या सालीचा रंग गुलाबी ते गडद लालसर असतो. साल खरडसर आणि सालीखाली पांढरट पारदर्शक गर असतो. गर गोडसर, रसाळ व सुगंधी असतो. फळाच्या आत एक गडद तपकिरी रंगाचे बी असते.
पोषणमूल्ये : लीची हे पोषणमूल्यांनी भरलेले फळ आहे. कॅल्शियम आणि फॉस्फरस शरीरासाठी उपयुक्त. विटामिन सी चे समृद्ध स्रोत आहे. अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स मुबलक प्रमाणात.
आरोग्यदायी फायदे : रोगप्रतिकारशक्ती वाढवते. त्वचेसाठी फायदेशीर आहे. पचन सुधारते. अॅन्टी-एजिंग घटकामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. हृदयाचे आरोग्य सुधारते.



