फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्याचे सोमवारी आयोजन

0
281
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार वितरण सोमवार ( १२ मे ) रोजी करण्यात येणार असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत याचे आयोजित करण्यात आले आहे. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनात दुपारी बारा वाजता सोहळा संपन्न होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत.

यावेळी शहरी विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ राज्यमंत्री तथा सहपालक मंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि जिल्ह्यातील इतर मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख (देसाई) यांनी दिली आहे.

———————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here