प्रसारमाध्यम डेस्क
सध्या भारत आणि पाकिस्तानया दोन देशातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वॅन्स यांनी आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्या वादात पडणार नसल्याचं म्हटलं आहे. वॅन्स यांनी यावेळीच अणू युद्ध होणार नाही हे देखील स्पष्ट केलं. मात्र त्यापूर्वी अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्याचं आणि चर्चा सुरु ठेवण्याचं आवाहन केलं होतं.
जे डी वॅन्स हे आंतरराष्ट्रीय संघर्षांपासून अमेरिेकनं अलिप्त राहण्याच्या भूमिकेचे समर्थक आहेत. “ज्याच्याशी मुलभूतपणे आमचा काही संबंध नाही. अमेरिकेला याला नियंत्रित करण्यासंदर्भात काही देणं घेणं नाही. आम्ही दोन्ही देशानां शस्त्र खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. आम्ही राजनैतिक मार्गानं या प्रकरणात पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय”, असं जे डी वॅन्स म्हणाले. भारत आणि पाकिस्तानकडे अणूबॉम्ब आहे. यासंदर्भात बोलातना जेडी वॅन्स यांनी अणू युद्ध होणार नाही , अशी अपेक्षाही व्यक्त केली.
अमेरिकेनने भारत आणि पाकिस्तानला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तणाव कमी करण्याचा संदेश दिला आहे आणि दोन्ही देशांनी चर्चा सुरु ठेवावी, असं अमेरिकनं म्हटलं आहे. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस म्हणाले की “तणाव वाढू नये याशिवाय संवाद मुलभूतपणे महत्त्वाचा आहे, चर्चा झाली पाहिजे”. भारत आणि पाकिस्तानमधील स्थिती नाजूक आणि धोकादायक असल्याचं म्हटलं. त्याचबरोबर जिथं चर्चा होत आहे तिथं आम्ही तपशीलाबाबत बोलत नाही, असं ब्रूस यांनी म्हटलं. नेत्यांच्यामध्ये चर्चा सुरु असतना मीडिया, जागतिक माध्यमांमध्ये तपशील न मांडण महत्त्वाचं ठरतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.