कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यात एका जिल्ह्यात कोणत्याही नोंदणी कार्यालयात जिल्ह्यांतील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहेत. पुढील काही दिवसांत ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ धोरण अमलात आणणार असून राज्यात कुठूनही जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
‘वन ड्रिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ ही योजना सर्वात आधी मुंबईत लागू करण्यात आली. त्यानंतर आता ती राज्यभर लागू करण्यात आली आहे. यामुळे एका जिल्ह्यातील दस्त नोंदणी त्या जिल्ह्यातील कोणत्याही नोंदणी कार्यालयातून करता येणार आहे.
जमीन किंवा सदनिकेसाठी पूर्वी नेमून दिलेल्या दस्तनोंदणी कार्यालयात जाण्याची आता गरज नाही. आपल्या सोयीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयातून ही नोंदणी करता येईल. याबाबत बावनकुळे म्हणाले, ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ लागू झाले असून, ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ हे धोरण अमलात येणार आहे. राज्यातील कोणत्याही भागातील जमीन अथवा सदनिकेची दस्त नोंदणी कोणत्याही नोंदणी कार्यालयातून करता येणार आहे.
—————————————————————————————



