कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोन आणि इतर उपकरणांचं अधिकाधिक उत्पादन चीनऐवजी भारतासह अन्य ठिकाणी नेण्यात येत असल्याचं अॅपल कंपनीनं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनसंबंधीच्या टॅरिफ पॉलिसीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अॅपलचे प्रमुख टीम कुक यांनी म्हटलं की, पुढच्या काही महिन्यांत अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश आयफोन भारतात तयार होतील. iPads आणि Apple Watches सारख्या वस्तूंच्या निर्मितीसाठी व्हिएतनाम हे उत्पादन केंद्र असेल.
अॅपलचा अंदाज आहे की, अमेरिकेच्या नवीन करांमुळे त्यांच्या खर्चात या तिमाहीत सुमारे 900 दशलक्ष डॉलर्सची वाढ होईल. ट्रम्प यांनी काही महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना करमुक्त केलं असलं, तरीही हा खर्च वाढू शकतो.
ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर अधिक कर लावण्याची घोषणा केल्यावर अॅपलचे शेअर्स घसरले होते. कंपन्यांनी अमेरिकेतच उत्पादन करावं यासाठी हे नवीन करधोरण होतं.
मात्र या निर्णयानंतर ट्रम्प सरकारवर प्रचंड दबाव आला. काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंना करातून सूट देण्यात आली, ज्यामध्ये फोन आणि कॉम्प्युटरसारख्या वस्तूंचा समावेश होता.
——————————————————————————————–






