कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गार गार काकडी…
उन्हाळ्यात लय भारी…
आंबट नाही…गोड नाही…
तरीही चवदार…
मीठ-चटणी संगे…
लागे लय भारी!
काकडी, कलिंगड, अननस, स्ट्रॉबेरी, पाण्याचा नारळ, संत्रा, आडू ही पाणीदार फळे उन्हाळा सुसह्य करण्यास मदत करतात. यापैकी काकडी साधारण जानेवारीमध्ये बाजारात येते. उन्हाळ्याच्या आगमनाआधी काकडी बाजारात येते. ही कवळी काकडी कुर्रुम कुर्रुम खाण्यात वेगळीच मजा असते. मीठ-चटणीशिवाय ही काकडी खायला मजा येते. उन्हाळा वाढेल तशी काकडी पाणीदार होते. काकडी मुख्यतः उन्हाळ्यात खाल्ली जाते कारण ती थंडावा देणारी, पचनास हलकी व पाण्याचे प्रमाण भरपूर असलेली आहे.
काकडीची पोषणमुल्ये : पाणी – ९५ ते ९६ टक्के, उष्मांक (कॅलरीज) – 16, फायबर्स – 0.5 ग्रॅम, जीवनसत्त्वे – सी, के आणि काही प्रमाणात ए व बी, खनिजे: पोटॅशियम, मॅग्नेशियम
आरोग्यदायी फायदे : शरीरात थंडावा निर्माण करते, त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करते (डिटॉक्स), वजन कमी करण्यास मदत करते (कॅलरीज कमी असतात), पचनासाठी उपयुक्त.
उपयोग: कोशिंबीरमध्ये, सांडगे, थालीपीठाबरोबर, रायते किंवा थेट कच्ची खाल्ली जाते याचबरोबर सौंदर्यप्रसाधनांमध्येही वापर (डोळ्यांवर ठेवणे, फेसपॅकमध्ये इ.)