मोबाईल चोरीला जातोय… आता नको टेन्शन

0
130
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
स्मार्टफोन सध्या अत्यावश्यक बाब झाली आहे. मुलांपासून ते वृद्धांपर्यत याची सर्वाना गरज वाटते. या फोनच्या महत्त्वामुळेच चोरीला जाण्याचेही प्रमाण वाढले आहे. अशा घटना सर्रास घडताहेत. 
प्रवासात बस-ट्रेन मध्ये अगदी सहज तुमचा फोन खिशातून चोरला जाऊ शकतो, हे कळत देखील नाही. म्हणूनच यावर गुगलने यावर उपाय शोधला आहे. 
युजर्सच्या सुरक्षेसाठी गुगलने अनेक सेफ्टी फीचर आणले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गुगलच्या सिक्रेट फीचरची माहिती देणार आहोत, ज्याचा वापर करून फोनची चोरी रोखता येईल. हे फिचर ऑन केल्यास तुमचा फोन चोरी झाल्यावर त्यातील अलार्म वाजू लागेल. यामुळे जर चोर तुमच्या जवळ असेल तर त्याला पकडणे सोपं जाईल. गुगलच्या या फीचरचं नाव Anti Theft Alarm आहे. हे फीचर सध्याच्या सर्व लेटेस्ट Android व्हर्जन असलेल्या स्मार्टफोन्समध्ये मिळतं. चला जाणून घेऊया तुमच्या Android स्मार्टफोनमध्ये हे फीचर कसं अ‍ॅक्टिव्हेट करायचं.
  • Android फोनमध्ये Anti Theft Alarm फीचर ऑन करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Settings ओपन करा.
  • सेटिंग्स मध्ये तुम्हाला स्क्रोल-डाउन केल्यानंतर Security and Privacy चा ऑप्शन दिसेल.
  • त्यानंतर More Security वर टॅप करा.
  • इथे तुम्हाला Anti-Theft Features चा ऑप्शन मिळेल. त्यावर टॅप करा.
  • त्यानंतर नेक्स्ट स्क्रीनवर Anti-Theft Alarm चा ऑप्शन मिळेल.
  • तुम्हाला Anti-Theft Alarm च्या समोर दिसत असलेला टॉगल ऑन करा.

Anti-Theft Alarm च्या समोरील टॉगल ऑन केल्यानंतर जेव्हा तुमचा फोन चोरी होईल त्यावेळी मोठ्या आवाजाचा एक अलार्म वाजू लागेल. हे नवीन फिचर बहुतांश स्मार्टफोनमध्ये देण्यात आलं आहे. परंतु जर तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये असं अँटी-थेप्ट अलार्म फीचर सापडत नसेल तर सेटिंग मध्ये लिहून सर्च करा. तुमच्या स्मार्टफोन ब्रँडनुसार हे फिचर वेगळ्या नावाने किंवा वेगळ्या सेटिंग अंतर्गत दिलं गेलं असावं.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here