मुलांचे लैंगिकता विषयक प्रश्न कसे हाताळावेत ? प्रशिक्षक कार्यशाळेचे आयोजन

0
339
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

आजच्या बदलत्या समाजरचनेत मुलांचे लैंगिक शिक्षण ही एक अपरिहार्य गरज बनली आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, टीव्ही व मित्रमंडळींच्या प्रभावामुळे मुलांना लवकरच अनेक गोष्टींची माहिती होते. अशावेळी, त्यांना योग्य दिशा देणे आणि त्यांच्या शंकांचे समाधान करणे पालक आणि शिक्षकांची जबाबदारी बनते. प्रशिक्षक म्हणून वैज्ञानिक माहिती, सकारात्मक दृष्टिकोन, संवाद कौशल्ये आणि प्रभावी मार्गदर्शन तंत्रे आत्मसात करण्यासाठी प्रयास आरोग्य गट, पुणे आणि मानस संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुलांचे लैंगिकता विषयक प्रश्न कसे हाताळावेत?’ ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

झपाट्याने बदलती परिस्थिती, टेक्नॉलॉजीचा वाढता वापर यासारख्या गोष्टींमुळे मुलांना, पालकांना व शिक्षकांना वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. मुलांच्या मनात लैंगिकतेबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षकांनी लैंगिकतेबद्दल सखोल समज विकसित करणे आवश्यक आहे.

कार्यशाळेतील मुख्य विषय –
  • लैंगिकता म्हणजे काय ?
  • लैंगिकतेवरील शिक्षण का महत्त्वाचे आहे?
  • मुलांबरोबर लैंगिकतेवर संवाद कसा साधावा?
  • लैंगिकतेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा?
  • मुलांना योग्य मदत कशी करावी?

कार्यशाळा कोणासाठी ?-
  • जे मुलांसोबत व तरुणांसोबत काम करतात
  • समुपदेशक, शिक्षक, कम्युनिटीमध्ये काम करतात
  • जे सध्या लैंगिकता शिक्षण देतात किंवा यासंदर्भात कार्यक्रम राबविण्याचा विचार करत आहेत
    —————————————
  • नोंदणीसाठी संपर्क – 
  • स्मिता पवार
    संवाद- ९०२८०२२२०३
    मेल आयडी- manaskolhapur2018@gmail.com
  • नोंदणी शुल्क – १०००/-( दुपारच्या जेवणासाहित )
    तारीख – १० व ११ मे २०२५ (शनिवार व रविवार)
    वेळ – १०.०० ते ५.००
    ठिकाण – सराय, लोकनेते सदाशिवराव मंडलिक मार्ग, एस. जी. फाइटो फार्मा जवळ, राजेंद्रनगर चौकाजवळ, सम्राट नगर, कोल्हापूर, महाराष्ट्र – ४१६००८
  • ——————————————————————————-
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here