कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
येत्या पाच वर्षांत रस्ता आणि वीज या सोयी उपलब्ध करून देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ, असे स्पष्ट संकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
आजनसरा येथे भोजाजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यादरम्यान बावनकुळे यांनी भाविकांशी संवाद साधला. यावेळी आमदार समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी रस्ता आणि विजेची सोय आवश्यक आहे. येत्या पाच वर्षांत या सोयी उपलब्ध करून देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ.असे आश्वासन त्यांनी दिले.———————————————————————————————
Be the first to write a review