spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeशासकीय योजनाआता कारागृहातच होणार सुसज्ज कोर्टरुम

आता कारागृहातच होणार सुसज्ज कोर्टरुम

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
न्यायालयात सुनावणीसाठी आणताना बंदीवानांमध्ये होणारी हाणामारी टळावी, वेळ व इंधनच्या बचतीसह वेळेत निकाल लागावा याकरिता आता नागपूर मध्यवर्ती कारागृह परिसरातच नवीन सुसज्ज कोर्टरूमची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी जागा निश्चित झाली असून, शासनाने निधीही मंजूर केला आहे.
 
लवकरच कारागृहात न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहाची बंदीवान क्षमता १,९४० असून सध्या येथे तीन हजारांपेक्षा अधिक बंदीवान आहेत. यापैकी तब्बल सव्वाशे कुख्यात, आक्रमक बंदीवान आहेत. त्यांच्याभोवती कारागृहात सुरक्षेचे जाळे अधिक घट्ट विणण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच गृह विभागाने कारागृह परिसरात नवीन कोर्टरूमच्या बांधकामासाठी २ कोटी १ लाख ९८ हजार ६६१ रुपये तर कारागृहातील व्हिडीओ कॉन्फरन्स कक्षाच्या विस्तारीकरणासाठी २ कोटी २२ लाख ६२ हजार ११२ असा एकूण ४ कोटी २४ लाख ६० हजार ७७३ रुपयांचा निधी मंजूर केला.

कोर्टरूममध्ये न्यायाधीशांचे चेम्बर, आरोपी व साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कठडे, न्यायालयात आवश्यक त्या सर्वच सुविधा, वकिलांसाठी वेगळी खोली, शौचालय आदींसह अत्याधुनिक सुविधांनी ही इमारत सुसज्ज असेल. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा आराखडा व कारागृहातील जागाही निश्चित केली आहे. सध्या कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सचे २२ युनिट आहेत. या युनिटवाढीसाठी २ कोटी २२ लाखांचा निधी मंजूर झाल्याने यात वाढ होऊन ती ५० वर जाईल. त्यामुळे बंदीवानांना नातेवाइकांशी संवाद साधणे अधिक सोयीचे होईल.

मनुष्यबळ वाचेल, सुविधांतही वाढ
गंभीर प्रकरणे वगळता अन्य खटल्यांत बंदीवानांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करणे आवश्यक नसते. नवीन कोर्टरूम व व्हिडीओ कॉन्फरन्स कक्षाच्या विस्तारीकरणानंतर कारागृहाचे मनुष्यबळ वाचेल. याशिवाय, सुविधेत भर पडून तारखेवरच न्यायालयाचे कामकाज होईल. सार्वजनिक बांधकामद्वारे गृहविभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यासाठी गृहविभागाने निधीही मंजूर केला. लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांनी प्रसारमाध्यमाना दिली.
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments