कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
वाहनांचे हॉर्न भारतीय वाद्यांवर आधारित म्हणजेच बासरी, तबला, व्हायोलिन, हार्मोनियम यांचे असावेत, असा कायदा तयार करण्याच्या आम्ही विचारात आहोत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिली.
एका वृत्तपत्राच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, येत्या काही दिवसांत तुम्हाला तुमच्या गाडीच्या हॉर्नमधून ढोलकी किंवा बासरीचा आवाज ऐकू येण्याची शक्यता आहे. सर्व वाहनांचे हॉर्न भारतीय वाद्यांवर आधारित म्हणजेच बासरी, तबला, व्हायोलिन, हार्मोनियम यांचे असावेत, असा कायदा तयार करण्याच्या आम्ही विचारात आहोत. जेणेकरून हॉर्न ऐकायला आनंददायी असतील.
देशातील वायू प्रदूषणात वाहतूक क्षेत्राचा वाटा ४० टक्के आहे. नरेंद्र मोदी सरकार ग्रीन आणि जैवइंधनावर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देत आहे, ज्यात मिथेनॉल आणि इथेनॉलचा समावेश आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले.
भारताला दुचाकी आणि कारच्या निर्यातीतून सर्वाधिक महसूल मिळतो. भारत सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे. २०१४ मध्ये भारताचे ऑटोमोबाईल क्षेत्र १४ लाख कोटी रुपयांचे होते, जे आता २२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. फक्त अमेरिका आणि चीन भारताच्या पुढे आहेत.
२०१४ मध्ये भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचे मूल्य १४ लाख कोटी रुपये होते. जे आता २२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. भारताने जपानला मागे टाकत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ बनली आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं.
—————————————————————————–



