इथे आपण ज्येष्ठ अभिनेते सौरभ शुक्लाबद्दल बोलत आहोत. हे तेच आहेत ज्यांनी जॉली एलएलबीमध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेत ठसा उमटवला आहे. १९६३ मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे जन्मलेल्या सौरभला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला. त्यांचे आईवडील शास्त्रीय संगीतात पारंगत होते. असे म्हटले जाते की सौरभची आई जोगमाया शुक्ला या भारतीय संगीतातील पहिली तबला वादक आहे. सौरभ २ वर्षांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंब दिल्लीला आले.
१९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ चित्रपटात सौरभ शुक्ला यांनी ‘कल्लू मामा’ची भूमिका साकारली होती, जी आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. यानंतर सौरभने कधीही मागे वळून पाहिले नाही. या अभिनेत्याने ताल, बादशाह, आरक्षण, गुंडे, नायक, बर्फी, किक, ओएमजी आणि पीके सारख्या उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. सौरभ शुक्ला आता ६२ वर्षांचे आहेत. अजूनही ते सिनेमांमध्ये कार्यरत आहेत. सौरभ यांनी आतापर्यंत तिन्ही खानांसोबत काम केले आहे. सौरभच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले ते जॉली एलएलबी ३, आयडेंटिटी कार्ड, नो रुल्स फॉर फूल्स आणि मनोहर पांडे यांसारख्या सिनेमांमध्ये दिसणार आहे.