spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeआरोग्यपाण्याचं प्रमाण कमी झाल्यास उच्च रक्तदाब वाढतो

पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास उच्च रक्तदाब वाढतो

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

“पाणी हे जीवन आहे. आपण त्याबद्दल अनेकदा ऐकत असतो. पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. आपल्या शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण असणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते तेव्हा त्याला ‘डिहायड्रेशन’ म्हणतात. त्याच वेळी जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब सामान्य मानकांपेक्षा जास्त असतो तेव्हा त्याला ‘उच्च रक्तदाब’ म्हणतात.’

शरीरात पुरेसं पाणी नसेल तर रक्ताचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया नीट होत नाही. परिणामी हृदय आधिक ताण देऊन रक्त पंप करते आणि रक्तदाब वाढतो. याखेरीज पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास रक्त घट्ट होतं आणि ते योग्य प्रकारे पंप होऊ शकत नाही. डिहायड्रेशनमुळे इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडतं आणि त्याचा हृदयाच्या ठोक्यावर विपरीत होऊ शकतो.

उच्च रक्तदाबाचे रुग्ण आणि डिहायड्रेशन

जर उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णाला तीव्र डिहायड्रेशन झालं तर त्याची स्थिती गंभीर होऊ शकते. त्यावेळी त्याला योग्य प्रमाणात मीठ आणि द्रवपदार्थ देणं महत्वाचं आहे. रुग्णाने पूर्वी कमी मीठयुक्त आहार घेतला असेल, परंतु डिहायड्रेशन झाल्यास, शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी आणि रक्तदाब जास्त घसरू नये म्हणून थोडं मीठ देणं आवश्यक असतं.

औषधांमुळे डिहायड्रेशनची शक्यता

उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी अनेकदा लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे दिली जातात, जी शरीरातून जास्त पाणी आणि मीठ काढून टाकतात, परंतु जर ही औषधं जास्त प्रमाणात दिली गेली, विशेषतः वृद्ध रुग्णांना तर त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते आणि ते डिहायड्रेशनचे बळी ठरू शकतात. म्हणून डॉक्टर सल्ला देतात की वृद्ध रुग्णांना जास्त काळासाठी उच्च डोस डाययुरेटिक्स टाळावेत आणि गरजेनुसारच औषधं द्यावीत.

डिहायड्रेशन आणि उच्च रक्तदाब

शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता आणि वाढलेला रक्तदाब यांच्यात थेट संबंध नाही, परंतु तीव्र डिहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. पाण्याचं योग्य प्रमाण राखणं प्रत्येकासाठी महत्वाचं आहे.

शरीरात पाण्याची कमतरता असल्याची लक्षणं
अ. त्वचा कोरडी पडू लागते. रॅश येऊन खाज सुटते.
ब. लघवीचा सौम्य पिवळा रंग बदलून गडद पिवळा होतो.
क. श्वासाला असह्य दुर्गंधी येते.
ड. वारंवार डोकं दुखून अंगात आळस भरतो.

डिहायड्रेशन आणि उच्च रक्तदाबाचे उपाय

अ. डिहायड्रेशन टाळण्यासाठी पुरेसं पाणी प्या.
ब. रोज सकाळी उठल्यावर सोसेल एवढं गरम पाणी प्यायची सवय लावा.
क. लिंबू पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
ड. नियमित व्यायाम केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments