
शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यातील लोकांची कामं वेळेत व्हावी आणि झोपी गेलेल्या भूमी अभिलेख विभागाला जाग यावी तसेच कित्येक वर्षापासून या खात्यातील रिक्त जागा न भरल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होत आहे. ती रिक्त पदं त्वरित भरण्यात यावी. त्याचबरोबर प्रलंबित मोजणी काम तातडीने करण्यात यावीत या मागण्या करत मनसेच्या आंदोलकांनी भूमी अभिलेखच्या दारात अंथरून घालून अभिनव असे आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु तालुक्याच्या ठिकाणी आज हा फार मोठा चर्चेचा विषय झाला.
या आंदोलनावेळी जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोरे, मनसेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम, सतीश तांदळे, राहुल कुंभार,विजय परीट, मधुकर पाटील, नयन गायकवाड, रोहित कदम, तुषार चिकुर्डेकर, संदीप लाळे, तानाजी मालुसरे, धनाजी गुरव, सचिन कांबळे आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.



