कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आता नव्या शैक्षणिक वर्षांपासून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काही बदल केले आहेत. यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी, इंग्रजी बरोबर हिंदी भाषा देखील शिकवली जाणार आहे. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी, इंग्रजी व त्या शाळेची माध्यम भाषा शिकवण्याचे धोरण निश्चित झाले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, नवा आकृतीबंध तयार करण्यात आला असून, कोणत्या शैक्षणिक वर्षात कोणत्या इयत्तेचा अभ्यासक्रम बदलणार हे देखील निश्चित करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.
राज्य शासनाने बुधवारी ( ता.१४ ) रोजी काढलेल्या आदेशानुसार, सुधारित आकृतीबंध, नवीन अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणी, भाषा विषयक धोरण, अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती व सेतू अभ्यास, पाठ्यपुस्तके व पाठ्य साहित्य विषयी योजना, मूल्यमापन आणि शालेय वेळापत्रक व तासिकांचे नियोजन या बाबी संबंधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळांना जोडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीचा अंतिम शासन निर्णय अजूनही झालेला नाही पण भविष्यात हा बदल होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे
शासन निर्णयातील ठळक बाबी :
दरम्यान, नवीन आकृतीबंधानुसार ( ३ ते ८ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी बालवाटिका १,२,३ आणि इयत्ता पहिली व दुसरी), पूर्व तयारी स्तर ( ८ ते ११ वर्षे तिसरी ते पाचवी), पूर्व माध्यमिक स्तर (११ ते १४ वर्षे सहावी ते आठवी), माध्यमिक स्तर (१४ ते १८ वर्षे नववी ते बारावी)
२०२५-२६ मध्ये इयत्ता पहिली तर २०२६-२७ मध्ये दुसरी, तिसरी, चौथी व सहावी, २०२७-२८ मध्ये, पाचवी, सातवी, नववी, अकरावी आणि २०२८-२९ पासून इयत्ता आठवी, दहावी व बारावीच्या वर्गाच्या नवीन अभ्यासक्रमांची होईल अंमलबजावणी.
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार यापुढे येता पहिली ते पाचवी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे. तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील.
इयत्ता सहावी ते दहावीसाठी भाषा धोरण अभ्यासक्रम आराड्यात आराखड्याप्रमाणे राहील. राज्याचा गरजा लक्षात घेऊन राज्याचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात येत असून संबंधित स्तराचे अंतिम पाठ्यसाहित्य निर्मितीसाठी बालभारतीस विहित वेळेत उपलब्ध करून देण्यात यावी. नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम संबंधित सर्व इयत्तांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार करावा ते आवश्यकता सर्व वर्षांमध्ये वापरण्यात यावा