परदेशात करा एम.बी.बी.एस… भारतात मिळेल नोकरी

0
162
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

आपल्याकडे पोराला शिकायला पाठवले की, प्रत्येक आई बापाला आपल्या पोराने डॉक्टर, इंजिनीयर व्हायला पाहिजे असे वाटते. त्यासाठी त्याला चांगल्या शाळेत पाठवले जाते. क्लास लावले जातात.यातून काही मुलं त्यांची स्वप्ने पूर्ण करतात.पण, काहींना ते शक्य होत नाही. जी मुले मनापासून याचा ध्यास घेतात.अभ्यास करतात त्यांच्यासाठी चांगल्या संधी आहेत. आपल्याकडे नीट परीक्षा देऊन चांगले गुण मिळाल्यास परदेशात कमी खर्चात पुढचे वैद्यकीय शिक्षण घेता येते आणि नोकरी मिळवण्याची चांगली संधी देखील मिळू शकते.

एमबीबीएस (बैचलर ऑफ मेडिसिन, बैचलर ऑफ सर्जरी) करणे हे भारतातील अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. खास करून त्यांच्यासाठी जे जीवशास्त्र (बायोलॉजी) शिकत असतात. मात्र, काही वेळा चांगली रँक मिळवता येत नाही किंवा घरच्या आर्थिक स्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. एमबीबीएससाठी खूप मेहनत आणि तयारी लागते. तसेच भारतात नीट परीक्षा देऊन चांगले गुण मिळवणे आवश्यक असते. पण, ही परीक्षा अत्यंत कठीण आहे आणि आर्थिक दृष्ट्या कमी पाठींबा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे किंवा खासगी कॉलेजची महागडी फी भरणे अवघड होऊ शकते.

त्यामुळे अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतात. परदेशात एमबीबीएस करण्यासाठी काही देश उत्तम पर्याय ठरतात, जेथे कमी खर्चात शिक्षण घेता येते आणि नोकरी मिळवण्याची चांगली संधी देखील आहे.परदेशात शिक्षण घेत असताना भाषा, राहणं आणि खाण्या-पिण्याच्या बाबी जरा जास्त त्रासदायक होऊ शकतात. तरीही, जर तुम्ही मेहनत आणि समर्पणासाठी तयार असाल, तर हे पर्याय तुमचं करिअर घडवू शकतात आणि तुम्हाला भविष्याची उत्तम संधी मिळवून देऊ शकतात.

अमेरिका हा एमबीबीएससाठी एक उत्तम पर्याय आहे, कारण येथील नोकऱ्यांमध्ये उच्च पगाराची संधी आहे. अमेरिकेतील डॉक्टरांची सरासरी वार्षिक कमाई $1,65,347 आहे, म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 1.39 कोटी रुपये! परंतु, अमेरिकेतील एमबीबीएसचा खर्च चांगला जास्त आहे.

जर तुम्हाला कमी खर्चात एमबीबीएस करण्याचा विचार करत असाल, तर रशिया, फिलिपिन्स आणि युक्रेन हे देश चांगले पर्याय आहेत. या देशांमध्ये एमबीबीएसचा खर्च तुलनेत कमी आहे, आणि एमबीबीएस पूर्ण केल्यावर भारतात सरासरी 6 ते 8 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळवण्याची संधी आहे.

चीन आणि जॉर्जिया हे देश देखील एमबीबीएस शिकवतात आणि इथे देखील कमी खर्चात शिक्षण घेता येते. तसेच, नोकरी मिळण्याची ग्वाही देखील दिली जाते. तथापि, भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी एमसीआय (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया) ची परीक्षा पास करणे आवश्यक असते.आता, विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी असताना, त्यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थिती आणि भविष्याची योजना लक्षात ठेवून योग्य निर्णय घ्यावा, जेणेकरून त्यांना उत्तम शिक्षण आणि नोकरी मिळवता येईल.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here