कोल्हापूरच्या सात जणांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

0
265
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

पुण्यात म्हाळूंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे शुक्रवारी १८ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पुरस्कार वितरण होणार आहे. विविध खेळ प्रकारातील कोल्हापूरच्या खेळाडूंच्या कौशल्य आणि विविध पातळीवरील दमदार कामगिरीचा गौरव महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने केला आहे. या पुरस्कारावर कोल्हापूरच्या सात खेळाडूने आपले नाव कोरले आहे.

प्यारा जलतरण प्रकारात कोल्हापूरचे मानसिंग यशवंत पाटील यांना दिव्यांग खेळाचे उत्कृष्ट क्रिडा मार्गदर्शक म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय ऍथलेटिक्स मध्ये किरण पांडुरंग भोसले, रब्बी मध्ये श्रीमती कल्याणी पाटील आणि पृथ्वीराज बाजीराव पाटील वेटलिफ्टिंग मध्ये, अभिषेक सुरेश निपाणी, कुस्तीमध्ये सृष्टी जयवंत भोसले आणि सॉफ्टबॉल मध्ये ऐश्वर्या पुरी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.

गतवर्षीच्या आठ खेळाडूंचा ही होणार सन्मान :

गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील आठ खेळाडूंना पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु,त्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले नव्हते. त्यांना यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूरची युवा गिर्यारोहक कस्तुरी दीपक सावेकर, रब्बी खेळाडू वैष्णवी दत्तात्रय पाटील , श्रीधर श्रीकांत निगडे, दिव्यांग जलतरणपटू अफ्रीद मुख्तार अत्तार, कळे येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी राष्ट्रीय सायकलपटू प्रतीक संजय पाटील, शाहू तुषार मानेला नेमबाजीत, अन्नपूर्णा सुनील कांबळे हीला थलेस्टिक, नंदिनी बाजीराव साळुंखेला कुस्ती, कुस्ती शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here