spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

Homeआरोग्यआता घरातच सर्प दंशावर होणार उपचार...संशोधकांनी शोधला रामबाण उपाय

आता घरातच सर्प दंशावर होणार उपचार…संशोधकांनी शोधला रामबाण उपाय

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

सर्पदंशातील मृत्यू वेळीच उपचार न मिळाल्याने होत असतात. परंतु, केनियात सापाच्या चावण्यावर मोठे संशोधन झाले आहे. या शोधामुळे घरातच सर्पदंशावर उपचार मिळणे शक्य होणार आहे. आतापर्यंत सर्पदंशावर एंटीव्हेनम औषध दिले जात होते. ते इंजेक्शनद्वारे देण्यात येत असते. ई-बायोमेडिसिनमध्ये एक लेख प्रकाशित झाला आहे. त्यातील एका अहवालात संशोधकांनी दावा केला आहे की, युनिथिओल नामक औषध जे सापाचे विष संपवण्यास मदत करते या उपयोग मेटल पॉयझनिंगच्या उपचारातमध्ये केला जात होता.

सापांच्या विषात मेटालोप्रोटीनेज आढळते. जे पेशींना धोका पोहचवते, त्यासाठी झिंकची आवश्यकता असते. ते हे शरीरातून घेते. युनिथिओल या झिंकला मार्गातून हटवून विष पसरविण्याचा मार्ग बंद करुन टाकतो. विशेष म्हणजे हे औषध पाण्यासोबत गोळी प्रमाणे देखील खाता येते. तसेच या औषधास प्रतिकूल वातावरणातही ठेवता येते. म्हणजे हे औषध कॅप्सुलच्या फॉर्ममध्ये बाजारात पुढे मागे मिळू शकते. आतापर्यत सांपाच्या विषाला संपवणारी जेवढीही औषधं बनविली होती त्यांना साठवून ठेवण्यासाठी एका विशिष्ट तापमानाची गरज असते. जे गावाच्या ठिकाणी उपलब्ध नसते. त्यामुळे गावातील ठिकाणी सर्पदंशाने माणसे अधिक दगावतात.

 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments