प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
नवी दिल्ली : देशातील वाढत्या उष्णतेचे संकट आता केवळ दिवसापुरते मर्यादित राहिले नसून, रात्रीच्या तापमानात होत असलेली झपाट्याने वाढ ही अधिक चिंताजनक ठरत आहे. भारतीय शहरांमध्ये ‘उष्ण रात्री’ (Hot Nights) वाढत असल्याचे ताज्या अभ्यासातून स्पष्ट झाले असून, सध्याचे ‘हीट अॅक्शन प्लॅन’ बदलण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
उष्ण रात्रींचा वाढता धोका
२०१२ ते २०२२ या कालावधीत देशभरात उष्ण दिवसांपेक्षा उष्ण रात्रींची संख्या अधिक वेगाने वाढल्याचे दिसून आले आहे. तब्बल ७० टक्के जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यात किमान ५ किंवा त्यापेक्षा अधिक अतिरिक्त उष्ण रात्री नोंदवल्या गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
शहरनिहाय स्थिती
वाराणसी येथे रात्रीच्या उष्णतेची तीव्रता सर्वाधिक
श्रीनगर येथे दिवसाच्या कंपाऊंड हीटवेव्हचे प्रमाण जास्त
किनारपट्टी व डोंगराळ शहरांमध्येही रात्रीची उष्णता अधिक वाढलेली
आरोग्यावर गंभीर परिणाम
Physics and Chemistry of the Earth मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, रात्री तापमान कमी न झाल्याने शरीराला थंड होण्यासाठी आवश्यक विश्रांती मिळत नाही. त्यामुळे खालील आजारांचा धोका वाढतो:
उष्माघात
मधुमेह
उच्च रक्तदाब
अभ्यासाचे तपशील
२००१ ते २०२४ दरम्यान १०० स्मार्ट शहरांचा अभ्यास कानपूरचे प्राध्यापक काशिफ इमदाद यांच्यासह संशोधकांचा सहभाग रात्रीच्या तापमानातील वाढ ही दीर्घकालीन आरोग्यास धोका ठरत असल्याचा निष्कर्ष उपाययोजना सुचविल्या आहेत.
‘कूल रूफ’ (थंड छत) संकल्पना राबविणे
नैसर्गिक व्हेंटिलेशन वाढविणे
शहरांमध्ये हरित क्षेत्राचा विस्तार
रात्रीच्या वेळेस थंड निवाऱ्यांची (Cooling Shelters) व्यवस्था






