उत्तुंग कर्तृत्वाच्या राजकिय,सामाजिक व्यक्तीमत्वांचे , कलाकारांचे,खेळाडुंचे चाहते त्यांची भक्ती करण्यात, त्याना फॉलो करण्यात, आणि ब-याच वेळा त्यांचे अनुकरण करण्यात कमी नसतात. चाहते, भक्त त्यांच्या दैवतावर, आयडॉल वर प्रेम करताना नेहमी त्यांचे चांगल होउ दे अशीच प्रार्थना करत असतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी, त्याना भेटण्यासाठी कितीही काळ त्यांची प्रतिक्षा करण्याची त्यांची तयारी असते. आपले पंतप्रधान मोदी यांचे असंख्य चाहते देशात व परदेशात आहेत. परंतु ते पंतप्रधान व्हावेत व त्यांची प्रत्यक्ष भेट व्हावी म्हणून थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 14 वर्षे अनवाणी राहणारा चाहता काही वेगळाच. शेवटी पंतप्रधान मोदी व याचाहत्याची14 मार्च ला भेट झाली. .पंतप्रधान मोदीनी या चाहत्याला आपला अनवाणी राहण्याचा प्रण पुरा करण्यासाठी ते फक्त भेटलेच नाहीत तर नवीन बुट देवून ते चढवायलाही मदत केली
मार्च 14 ला यमुनानगर मधे पंतप्रधान मोदी जेव्हा काही योजनांचे उद्धाटन करणेस आले तेव्हा रामलाल यांचे दुसरे स्वप्न पुर्ण झाले. म्हणजे तब्बल 14 वर्षे त्यानी पाउस,उन,चिखल. दगड,धोंडे न पाहता अनवाणी राहून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तरी प्रत्यक्ष भेट नाही म्हणून आपली अनवाणीच राहिले.
“त्यांच्या प्रेमामुळे मी अजुनच विनम्र झालो आहे. आज त्यांची भेट झाली. त्यानी जी शपथ घेतली होती ती आज त्याना पादत्राणे चढवून पुर्ण करण्याची संधी मला आज मिळत आहे”, असे भावूक उद्गार पंतप्रधान मोदी यांने काढले. एक धुरंधर नेता व तेवढाच कट्टर चाहता यांच्या भेटीचा विडीओ आपल्या एक्स अकाउंट वर दीला आहे व तो सोशल मेडीयावरही चांगलाच व्हायरल झाला आहे.
तुम्ही एवढी वर्षे अनवाणी राहून का त्रास करुन घेतला? यावर कश्यप यानी गेली 14 वर्षे हे करत आहे म्हणल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले’ “तो आज हम तुमको जुते पेहना रहे है. लेकीन बाद मे ऐसा कभी करना नही.”