राज्यात काही भागात दोन दिवसांत पावसाचा अंदाज

0
163
Google search engine

 कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होणार आहे. अनेक भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील एक दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे. यावल, चोपडा या तालुक्यात गारपीटसह जोरदार पाऊस कोसळलाय. पुण्यातील जुन्नरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तर नाशिक जिल्ह्यात अवकाळीने गहू, कांद्यासाह द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. तर दुसरीकडे कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात बहुतांशी भागात तापमानाचा पारा अजूनही ४० अंशावरच आहे. किनारपट्टीवरील तापमानात मात्र काही दिवसांपासून घट झाली असून ही घट कायम आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here