Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

मुंबई: भारतीय सराफा बाजारात आज गुंतवणूकदारांसाठी आणि दागिने खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. विशेषतः चांदीच्या दरात प्रति किलो १२,२२५ रुपयांची मोठी कपात झाली असून, सोन्याचे दरही प्रति तोळा १,२३२ रुपयांनी घसरले आहेत.

सोन्याचे आजचे दर (प्रति १० ग्रॅम):

सोन्याचा प्रकार जीएसटीशिवाय दर (₹) जीएसटीसह दर (₹) घसरण (₹)
२४ कॅरेट १,३५,४४३ १,३९,५०६ १,२३२
२३ कॅरेट १,३४,९०१ १,३८,९४८ १,२२७
२२ कॅरेट १,२४,०६६ १,२७,७८७ १,१२८
१८ कॅरेट १,०१,५८२ ९२४
१४ कॅरेट ७९,२३४

चांदीचा आजचा भाव:

आज चांदीच्या दरात मोठी पडझड झाली आहे. बुधवारी २४८,००० रुपये असलेला दर आता २,३५,७७५ रुपयांवर (जीएसटीशिवाय) आला आहे. ३% जीएसटीसह चांदीचा दर आता २,४२,८४८ रुपये प्रति किलो झाला आहे.

टीप: इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे जाहीर केलेले हे दर सरासरी आहेत. तुमच्या शहरातील स्थानिक दरांमध्ये ₹१,००० ते ₹२,००० पर्यंतचा फरक असू शकतो.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here