प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या चर्चेने झाली आहे. ७ वा वेतन आयोग ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपुष्टात आल्यानंतर १ जानेवारी २०२६ पासून ८ वा वेतन आयोग लागू झाल्याचे अपडेट्स समोर येत आहेत. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८व्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. या आयोगाअंतर्गत वेतनवाढ फिटमेंट फॅक्टरवर आधारित असणार असून, त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या मुळ पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अंतिम आकडे आणि अधिकृत अधिसूचना अद्याप प्रतीक्षेत आहे.
कुणाच्या पगारात होणार वाढ?
८व्या वेतन आयोगामुळे सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात वाढ
- वेतनवाढ कर्मचारी श्रेणी (Level) आणि पदानुसार
- केंद्र सरकारमध्ये एकूण १८ वेतन स्तर (Pay Levels)
- फिटमेंट फॅक्टर २.१५ राहिल्यास मोठी वेतनवाढ शक्य
- कर्मचारी श्रेणी (Pay Levels)
- Level 1 : एंट्री-लेव्हल / ग्रुप D कर्मचारी
- Level 2 – 9 : ग्रुप C कर्मचारी
- Level 10 – 12 : ग्रुप B कर्मचारी
- Level 13 – 18 : ग्रुप A (वरिष्ठ अधिकारी)
संभाव्य वेतनवाढ (फिटमेंट फॅक्टर 2.15 नुसार)
| वेतन स्तर | सध्याचा मुळ पगार | संभाव्य नवीन पगार | वाढ (₹) |
|---|---|---|---|
| Level 1 | ₹18,000 | ₹38,700 | ₹20,700 |
| Level 5 | ₹29,200 | ₹62,780 | ₹33,580 |
| Level 10 | ₹56,100 | ₹1,20,615 | ₹64,515 |
| Level 15 | ₹1,82,200 | ₹3,91,730 | ₹2,09,530 |
| Level 18 | ₹2,50,000 | ₹5,37,500 | ₹2,87,500 |
कुणाचा पगार सर्वाधिक वाढणार ?
फिटमेंट फॅक्टर लक्षात घेतल्यास Level 18 मधील वरिष्ठ अधिकारी, ज्यामध्ये कॅबिनेट सचिव, वरिष्ठ IAS/IPS अधिकारी यांचा समावेश आहे, यांच्या पगारात सर्वाधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
इतर कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ होणार असली तरी ती त्यांच्या स्तरानुसार मर्यादित असेल. त्यामुळे नव्या वेतन आयोगाचा मोठा फायदा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना होणार असल्याचे चित्र आहे.




