प्रसारमाध्यम : दिग्विजय माळकर
आता दारू पिणाऱ्याचे कंबरडे मोडल्यानंतर सरकारने आपला मोर्चा सिगरेट पिणाऱ्यांकडे वळवला असून देशभरातील सिगारेट व तंबाखू सेवन करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क (सुधारणा) विधेयक, 2025 ला संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर सिगारेटसह सर्व तंबाखू उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या कररचनेनुसार आज 18 रुपयांना मिळणारी सिगारेट लवकरच 72 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे एका सिगरेट ची किंमत चौपट वाढण्याची शक्यता आहे, असे झालेच तर… भावा फक्त एकच कश दे असे म्हणून ‘फुकट’ सिगरेट मागणाऱ्यांचे हि वांदे होणार आहेत.
या निर्णयाचा उद्देश तंबाखूचे सेवन कमी करणे आणि लोकांना धूम्रपान सोडण्यास प्रेरित करण्याचा आहे.पण याचा सर्वात जास्त परिणाम कॉर्पोरेट आणि आय टी क्षेत्रामधील नोकरदार वर्गावर होऊ शकतो. कारण तिथे कामाचा ताण घालवण्यासाठी सिगरेटचा आधार जास्त घेतला जातो, याच बरोबर सिगारेट व तंबाखु उत्पादनांच्या या मोठ्या दर वाढीमुळे लोक अवैधरित्या स्वस्तात मिळणाऱ्या गांजा आणि ड्रग्सकडे वळण्यायाची शक्यता नाकारता येत नाही. हा गंभीर मुद्दा लक्ष्यात घेऊन सरकारने या अवैधधंद्यावर आळा घालण्याची गरज आहे,तरच सरकारच्या या निर्णयाचा परिणाम चांगला दिसेल. एकंदरीत या निर्णयामुळे सिगारेट प्रेमी नाराज होणार हे निश्चित!
- केंद्रीय उत्पादन शुल्क (सुधारणा) विधेयक, 2025 मंजूर
- विधेयक अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सादर केले
- सिगारेट, सिगार, हुक्का, खैनी, जर्दा, चघळणारा तंबाखू यांवर उत्पादन शुल्क व उपकरात मोठी वाढ
सिगारेटची किंमत किती वाढणार? (ठळक आकडे)
- सिगारेटवरील उत्पादन शुल्क
₹200–₹735 (प्रति 1000 काड्या) ⟶ ₹2,700–₹11,000 (प्रति 1000 काड्या)
(प्रकार व लांबीवर अवलंबून) - खैनी / चघळणारा तंबाखू: 25% ⟶ 100%
- हुक्का तंबाखू: 25% ⟶ 40%
- धूम्रपान मिश्रण (पाईप/सिगारेट): 60% ⟶ 300% ते 325%
- सिगार, जर्दा, फ्लेवर्ड तंबाखू: करात लक्षणीय वाढ.
राज्यसभेतील प्रक्रियेनंतर कायद्याची अंमलबजावणी,अंमलबजावणीनंतर किंमतींमध्ये तात्काळ परिणाम अपेक्षित केंद्र सरकारच्या नवीन प्रस्तावित कायद्यानंतर सिगारेटच्या किमतीत विक्रमी वाढ निश्चित मानली जात आहे.






