प्रसारमाध्यम : दिग्विजय माळकर
नाताळ व नववर्षानिमित्त मद्यविक्रीच्या वेळेत सवलत;
नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर तळीरामांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने नाताळ आणि 31 डिसेंबरनिमित्त मद्यविक्रीची दुकाने आणि बिअर बार उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास विशेष सवलत दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी ही सवलत लागू राहणार आहे. मद्यविक्रीची दुकाने रात्री 1 वाजेपर्यंत, तर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बिअर बार आणि आस्थापनांना पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अनुज्ञप्तीनुसार वेळेची सवलत
-
FL-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्री)
▪️ रात्री 10.30 ते पहाटे 1 वाजेपर्यंत
▪️ उच्च व अतिउच्च दर्जा – रात्री 11.30 ते पहाटे 1
-
FLW-2 व FLBR-2
▪️ रात्री 10.30 ते पहाटे 1 -
FL-3 (परवाना कक्ष) व FL-4 (क्लब अनुज्ञप्ती)
▪️ पोलीस आयुक्तालय क्षेत्रात – रात्री 1.30 ते पहाटे 5
▪️ इतर भागात – रात्री 11.30 ते पहाटे 5 -
नमुना ‘E’ (बीअर बार) व E-2
▪️ मध्यरात्री 12 ते पहाटे 5 -
CL-3
▪️ महानगरपालिका, ‘अ’ व ‘ब’ वर्ग नगरपालिका – रात्री 11 ते पहाटे 1
▪️ इतर ठिकाणी – रात्री 10 ते पहाटे 1
प्रशासन सतर्क, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
वेळेत शिथिलता दिली असली तरी सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना वेळ कमी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नववर्षाच्या स्वागतादरम्यान ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिस सज्ज असतील. तसेच अवैध दारू विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.





