Google search engine

प्रसारमाध्यम : दिग्विजय माळकर

 

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर बुधवारी एक मोठा राजकीय घडामोड घडली. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे–शिवसेना (उबाठा) युतीची अधिकृत घोषणा केली. वरळीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.

या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी,
“मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल,”
असा ठाम विश्वास व्यक्त केला. मात्र, यावेळी मुंबईसह इतर महानगरपालिकांमधील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला नाही.

युतीच्या घोषणेपूर्वीच पहिला उमेदवार?

या महत्त्वाच्या घोषणेआधीच ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक खळबळजनक दावा केला.

‘एबीपी माझा’शी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या,
“मी 100 टक्के माझ्या वॉर्डमधून निवडणूक लढवणार आहे. मी स्वतः रणांगणात असेन.”

यामुळे शिवसेना–मनसे युतीच्या पहिल्या उमेदवार म्हणून किशोरी पेडणेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मनसे–शिवसेना युती 130 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठा अंदाज वर्तवला.

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने भाजपची पायाखालची जमीन सरकली आहे. मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू 130 पेक्षा अधिक जागा जिंकतील,”
असा दावा त्यांनी केला.

भाजपवर टीका करत त्या म्हणाल्या,
“आम्ही काय काम केलं आहे, हे मुंबईकरांना माहिती आहे.”


 किशोरी पेडणेकरांचा राजकीय प्रवास

  • 2017 मध्ये दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून विजयी

  • त्यानंतर मुंबईच्या महापौरपदी निवड

  • यंदा तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याने उमेदवारी धोक्यात असल्याच्या चर्चा

  • मात्र, युतीच्या घोषणेपूर्वीच तिकीट फिक्स असल्याचा ठाम दावा


 मुंबईतील संभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युला

फक्त शिवसेना (उबाठा) – मनसे युती

  • शिवसेना ठाकरे गट: 140 ते 150 जागा

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना: 60 ते 70 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) सहभागी झाल्यास

  • शिवसेना ठाकरे गट: 130 ते 140 जागा

  • मनसे: 60 ते 70 जागा

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 15 ते 20 जागा (शिवसेनेच्या कोट्यातून)

“बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र”

राज–उद्धव ठाकरे एकत्र आल्याने
“बाळासाहेबांचे दोन्ही बछडे पुन्हा एकत्र”
अशी प्रतिक्रिया शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये पाहायला मिळत आहे. येत्या काळात ही युती मुंबईच्या राजकारणात मोठा बदल घडवणार, हे निश्चित मानले जात आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here