जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा लग्नसोहळा : बहारीनमध्ये जय पवार–ऋतुजा पाटील यांचा शाही विवाहसोहळा; राजेशाही थाटात समारंभ पार पडला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा शाही विवाहसोहळा ५ डिसेंबर रोजी बहारीन येथे अतिशय थाटामाटात पार पडला.
विवाहसोहळ्याचे सुंदर क्षण ऋतुजा पाटील यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर केले असून, हे फोटो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.
या शाही विवाहसोहळ्यात जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी पारंपरिक मराठमोळा लूक केला होता, जो पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
जय पवार यांनी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान करून राजेशाही आणि देखणा लूक साधला होता.
दोघांचेही फोटो आणि विवाहसोहळ्याचे दृश्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
ऋतुजा पाटील यांनी पोस्ट केलेल्या फोटोला ‘Married my bestie’ अशी गोड आणि मनाला भिडणारी कॅप्शन दिली आहे.
या शाही विवाहसोहळ्याच्या सजावट, पोशाख आणि वातावरणामुळे हा सोहळा अनेकांच्या नजरेत भरला असून, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा पाटील/इन्स्टाग्राम)






