प्रसारमाध्यम डेस्क :
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपने जबरदस्त शतकी खेळी करत संघाचा डाव वाचवला. होपने फक्त ६६ चेंडूत शतक ठोकत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगलंच चकवलं.
वेस्ट इंडिजची सुरुवात अतिशय खराब झाली होती. केवळ ४० धावांपर्यंत दोन विकेट पडल्या आणि ८६ धावांवर अर्धा संघ बाद झाला. अशा कठीण परिस्थितीत होप एकीकडे ठाम उभा राहिला आणि एकहाती डाव सावरला.
होपने ६९ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांसह १०९ धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने ३४ षटकांत २४७ धावा उभारल्या. त्याच्याशिवाय संघातील कोणताही फलंदाज ३० धावांपलीकडे जाऊ शकला नाही.
ब्रायन लाराचा विक्रम मोडला
शे होपचं हे वनडेमधील १९वे शतक ठरलं. यासह त्याने आणखी एक मोठी नोंद आपल्या नावावर केली. होप आता वेस्ट इंडिजकडून सर्वात जलद ६,००० वनडे धावा करणारा दुसरा फलंदाज झाला आहे.
-
होप — १४२ डावांत ६,००० धावा
-
ब्रायन लारा — १५५ डावांत ६,००० धावा
म्हणजेच होपने दिग्गज ब्रायन लाराचाही विक्रम मोडत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.






