श्री तुळजा भवानी,तुळजापूर गाव आणि तिच्या गूढ गोष्टी व माहित नसलेल्या प्रथा परंपरा…..भाग – १

0
60
Google search engine

तुळजापूरच्या मंदिराशी संबंधित असलेल्या, नसलेल्या किती तरी गोष्टी आहेत ज्या माहीत नसतात. उदाहरणच द्यायचं झालं तर तुळजापूरजवळ असलेलं धाकटं तुळजापूर का वसलं हे माहीत आहे? ‘आराध’ बसणं म्हणजे काय? ‘दसरा काढणं म्हणजे काय? तुळजा भवानीसमोरच्या सारीपाटामागची गोष्ट काय आहे ?

 

तुळजाभवानीसंदर्भातल्या अनेक गोष्टींचा उलगडा करणारा लेख-

श्रीतुळजाभवानी ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचीच नव्हे तर देशातील लाखो लोकांचीही कुलस्वामिनी आहे. पण हे मंदिर किती पुरातन आहे हे ठामपणे सांगणे कठीण आहे. हे मंदिर सुरुवातीला चार कुटुंबांच्या खासगी मालकीचे होते. माणिकराव कदम पाटील, रोचकरी, मलबा आणि गणपतराव कदम यांचे पूर्वज ही ती चार कुटुंबे. या मूळ मालकांच्या देवीच्या दैनंदिन पूजेकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांचे नातेवाईक खपले, क्षीरसागर, हंगरगेकर, भोसले या घराण्यांनाही पूजेचा मान दिला गेला. मंदिरातील भक्तांची वाढती संख्या, मिळणारे प्रचंड उत्पन्न यामुळे ही पूजा करण्यासाठी या मूळ मालकांनी मग १६ कुटुंबांची ‘पाळकरी’ (पाळीपाळीने पूजा करणारे) म्हणून नेमणूक केली. त्यांना पाळ्या वाटून देण्यात आल्या होत्या. मिळणाऱ्या उत्पन्नातून पाळकऱ्यांना किती हिस्सा द्यायचा याचा संपूर्ण अधिकार या मानकऱ्यांना म्हणा किंवा मूळ सेवेकरांना होता. या पद्धतीने पाळकऱ्यांनी अनेक वष्रे प्रामाणिकपणे काम केले. पण नंतर मात्र त्या पाळकऱ्यांनीच हक्क सांगायला सुरुवात केल्याने भांडणे सुरू झाली. पाळकऱ्यांना उत्पन्न घेण्याचा अधिकार असला तरी मूळ मूर्तीला हात लावण्याचा अधिकार त्यांना नव्हता, तर तो कदमांनाच होता. त्यामुळे पाळकर कोर्टात गेले. प्रकरण न्यायालयात गेल्यावर त्यात कालांतराने पाळकरांनाही मूर्तीला हात लावण्याचा अधिकार आला. शिवाय त्यांचे हिस्सेही ठरवून दिले गेले. िहे प्रकरण उच्च न्यायालयात १९६० साली चालल्याची आठवण न्या.बी. एन. देशमुख सांगतात.

मूळ पाळकऱ्यांच्या व्यतिरिक्त वाकोजीबुवा इत्यादी महंतही मानकरी होते. विशेष म्हणजे वाकोजीबुवा महंतांची गादी तर अविवाहिताची आहे. त्यामुळे दत्तक घेऊनच त्यांचा उत्तराधिकारी ठरतो. या महंताची प्रेते जाळत नाहीत. मराठीत ‘गार भरली’ असा एक वाक्प्रचार आहे. मराठवाडय़ात तर बायका एकमेकींशी भांडताना सर्रास ‘तुझी गार भरली, तुझा मुडदा बसवला’ अशा शिव्या देतात. पण या ‘गार भरली’चा नेमका अर्थ कुठेच दिलेला नाही. तो इथे प्रत्यक्षात पाहायला मिळतो. ‘गार’ म्हणजे विहिरीसारखा एक खोल खड्डा. त्यात मीठ टाकून प्रेत पुरण्याची आगळीवेगळी प्रथा इथे आहे. मंदिराचे जे मानकरी आहेत त्यांना ते िहदू असले तरी जाळले जात नाही. त्यांचे प्रेत या विशिष्ट विहिरीपर्यंत रीतिरिवाजानुसार आणले जाते. तिथे त्या विहिरीत टाकून वर मीठ ओतून त्याखाली पुरले जाते.

पुढील भागात पाहू बकऱ्याची झडती म्हणजे काय ?

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here