मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्व उपाययोजना लागू

0
74
Chief Minister Fadnavis said that a wet drought has been declared and all drought relief measures will be implemented accordingly.
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे गंभीर संकटातून जात आहेत. गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे अंदाजे ६० लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पिके पाण्यात गेले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत या परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सांगितले. त्यांनी जाहीर केले की, ओला दुष्काळ जाहीर केला आहे आणि त्यानुसार दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्या जातील. मुख्यमंत्री म्हणाले, “मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळाची संकल्पना नसली तरीही, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्व उपाययोजना लागू होतील.”

शासनाने पहिल्या टप्प्यात २११५ कोटी रुपये शेतकऱ्यांना थेट वितरीत करण्याची कामे सुरू केली आहेत. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य असेसमेंट घेता येत नव्हते, त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत संपूर्ण माहिती गोळा करून नुकसानाच्या आधारावर मदत दिली जाईल. ही मदत खरडून गेलेली जमीन, विहिरी, घरांसंबंधी तातडीची मदत अशा विविध प्रकारच्या नुकसानीसाठी असेल. मुख्यमंत्री म्हणाले की, ” सगळी मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
कर्करोगावर मोफत उपचार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एका महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळाने सर्वंकष कॅन्सर केअर पॉलिसी तयार केली आहे. या पॉलिसी अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगाच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध होतील. सेंटर व एल-थ्री सेंटरचे जाळ तयार केले जात असून, शासकीय योजनेअंतर्गत लोकांना जवळच्या जिल्ह्यातच निदान व उपचार सुविधा मिळतील. यामुळे कर्करोगावर उपचाराची सुलभता वाढेल आणि खर्च कमी होईल.

या निर्णयांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कर्करोगावर उपचार सुविधा मिळण्यास मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पुढच्या आठवड्यात संपूर्ण नुकसानाचा अहवाल गोळा करून मदतीची घोषणा केली जाईल.

———————————————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here