spot_img
सोमवार, ऑक्टोबर 13, 2025

9049065657

Homeराजकीयखा.शाहू महाराज, आ.सतेज पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत

खा.शाहू महाराज, आ.सतेज पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत

कोल्हापूर: प्रसारमाध्यम न्यूज 

विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा आवाहन केलं होतं. त्यानुसार जमा झालेली मदत मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्याकडे आज पाठवण्यात आली. कसबा बावडा, भगवा चौक येथील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मदतीची ही वाहने मराठवाड्याकडे रवाना झाली.

पुरामुळे जनजीवन उध्वस्त झालेल्या मराठवाड्याला मदत करण्यासाठी धान्यासह किराणा सामान, प्रथमोचार साहित्य, सॅनिटरी पॅडस, चप्पल, पाणी बॉटल्स, कपड्यांपासून ते ब्लँकेटस, चटईपर्यत कोल्हापुरातील प्रत्येकान आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला. यातून तब्बल २७ टेम्पो भरुन गोळा झालेली मदत सोमवारी खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याकडे पाठवण्यात आली. कसबा बावडा येथील भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन २५ टेम्पो मराठवाड्याकडे रवाना झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष, आणि मराठवाड्याकडे जाणारी मदत यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपण्याचे काम काँगेसच्या माध्यमातून झाल्याची भावनाही यावेळी व्यक्त झाली.
जमा झालेली मदत धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच टेम्पो पाठवण्यात आले. मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळेच वाहून गेले. त्यामुळे संकटग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीन आमदार सतेज पाटील यांनी केले हाेते. या आवाहनाला चंदगडपासून ते शाहूवाडी पर्यंतच्या नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे अगदी चार-पाच दिवसात कॉग्रेस कमिटीचे कार्यालय मदतीने भरुन गेले होते. ही मदत २७ टेम्पोद्वारे पाठवण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार शाहू महाराजांनी कोल्हापूरकर एखाद्याला मदत करण्याच्या बाबतीत नेहमीच पुढे असतात. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आवाहन केल्यानुसार जमा झालेली मदत मराठवाड्याकडे पाठवण्यात येत आहे, काँग्रेसचा हा मदतीचा हात पूरग्रस्तांच्यासाठी आधार देणारा असेल असंही त्यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचे नेते खास. राहुल गांधी यांनी मराठवाड्याला मदत करण्याच आवाहन केल होत. त्याअनुषंगाने ही मदत पाठवण्यात येत असल्याचे सांगीतले. जिल्ह्यातील नागरिक अजून काँग्रेस कमिटीत येऊन मदत देत आहेत. सध्या मराठवाड्यात शाळेचे दप्तर आणि वह्या यांची गरज आहे. पुढच्या काळात दप्तर आणि वह्या दसऱ्यानंतर पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज पाठवण्यात आलेल्या मदतीमध्ये, जीवनावश्यक वस्तू ज्यामध्ये तांदूळ, गहू, साखर तूरडाळ मसूरडाळ, खाद्यतेल, शाबु, रवा आदि वस्तूंचा समावेश आहे. त्याचबरोबर पाण्याचे बॉटल्स, कपडे ब्लॅंकेट्स, शालेय उपयोगी साहित्य पाठवण्यात आले. यावेळी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार ऋतुराज पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, राहूल बजरंग देसाई, जीवन पाटील, सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक राजेश लाटकर, राहुल माने, अर्जुन माने, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, प्रताप जाधव, इंद्रजीत बोंद्रे, संदीप नेजदार, तौफीक मुल्लाणी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, राजू साबळे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, संजय पोवार – वाईकर, सुप्रिया साळोखे, विनायक घोरपडे, सरलाताई पाटील, वैशाली महाडिक, आदी उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments