कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आयुष्यात यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, असा प्रेरणादायी मंत्र स्पर्धा परीक्षेतून आयपीएस झालेले अधिकारी बिरदेव डोणे यांनी युवकांना दिला. जिल्हा प्रशासन आणि सायबर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर कॉलेजच्या आनंदभवन सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
प्रतिष्ठित शाही दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्राचार्या डॉ. बी. एन. मेनन, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.