दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत : महसूलमंत्री

0
134
Revenue Minister Chandrashekhar Bawankule said that it is possible to provide assistance to farmers before Diwali. All compensation will be decided after reviewing the entire state.
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा 
महाराष्ट्रातील पन्नास वर्षांत न पाहिलेले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, “ या नुकसानीतून शेतकऱ्यांना बाहेर काढणे हा सरकारचा सर्वोच्च प्राधान्य आहे. चार प्रोजेक्ट नाही झाले तरी चालतील, पण शेतकऱ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार यासाठी आवश्यक ती सर्व भूमिका घेतील.”

बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणे शक्य आहे. संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन सर्व नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. राज्यातील शेतकऱ्यांना NDRF च्या निकषांनुसार केंद्राकडून मदत मिळत आहे. पंचनामे ४-५ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होतील, त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेते बसून अंतिम निर्णय घेतील.

कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचे संरक्षण

बावनकुळे म्हणाले की, खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी समिती काम करत आहे. फार्महाऊस किंवा लेआउटवर असलेले शेतकऱ्यांना यातून वगळले जाईल. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावरच कर्जमाफीचा निर्णय होईल.

जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना त्यांनी सूचित केले आहे की, कुठलाही शेतकरी पिक विमा पासून वंचित राहू नये. “फिल्डवर आमचे अधिकारी असतील तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल. अन्यथा चुकीचे आकडे आले तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारचा निर्धार : बावनकुळे म्हणाले, “शेतकऱ्यांना मजबूत केलेशिवाय राज्याचा विकास शक्य नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.”
————————————————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here