Karveer Niwasini, mother Ambabai Bhagwati Bhuvaneshwari, has been decorated in the form of a Mahavidya.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी, दिनांक २६ सप्टेंबर २०२५ या दिवशी करवीर निवासिनी, आई अंबाबाई भगवती भुवनेश्वरी या महाविद्या स्वरूपात अलंकृत झाल्या आहेत.
भगवती भुवनेश्वरी, दशमहाविद्यांपैकी चौथ्या क्रमांकावर असणारी महाविद्या, काली कुळा तील प्राचीन अनादी शक्ती म्हणून प्रकट झाली. विश्वाची पालनकर्त्या म्हणून भुवनेश्वरी देवीला तिच्या हातात पाश, अंकुश, वरद व अभय या चार मुद्रा आहेत. अंकुश तिच्या नियंत्रण शक्तीचे तर पाश तिच्या नियमक शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्रिनेत्रा या रूपात अथर्वशीर्षात तिला महाविद्या म्हणून ओळखले जाते. तिच्या बीज ‘ऱ्हीं’ तांत्रिक प्रणव म्हणून पूजित केले जाते.
आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी, भुवनेश्वरी स्वरूपात सजल्याने मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने न्हाऊन गेले आहे. भक्तांनी सकाळ पासून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. स्थानिक तसेच दूरदूरच्या भक्तांनी या पावन दिवशी विशेष पूजा, आरती आणि धार्मिक विधींचा अनुभव घेतला.
भक्तांचे हृदय त्रिभुवनामध्ये करूणामय या जगदंबा देवीकडे न्हालून म्हणते, “ जगात अशी करूणामय कुणी नाही, अशी भुवनेश्वरी जगदंबा आम्हा सर्वांवर कृपा करो.” या दिवशी भक्त शांती, समृद्धी आणि आत्मिक समाधानासाठी देवीसमोर प्रार्थना करीत आहेत.
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिकः हे या दिवशी प्रत्येक भक्ताच्या मनापासून व्यक्त होत आहे.