कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
नवरात्रोत्सवाचे धार्मिक, सांस्कृतिक ,कृषि आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. हा उत्सव आदिशक्ती देवतांचा उपासनेचा उत्सव-सणआहे. या उत्सवात देव बसवतात. माती परीक्षणासाठी घटस्थापना करतात. शारिरीक आरोग्यासाठी नऊ दिवस उपवास करतात. मन प्रसन्न होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते. पावसाळ्यात नाना प्रकारच्या धान्याची पेरणी केली जाते. पिक भरघोस आल्यानंतर समाजामध्ये आनंदी वातावरण निर्माण होउन पैसा हाती येतो. पुढे दिवाळी सारखा सण साजरा केला जातो.
नवरात्र हा सण आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पावसाचा जोर कमी झालेला असतो. पचनशक्ती क्षीण झालेली असते. लंघन किवा उपवासाची शरीरासाठी गरज असते. सात्विक असायला पाहिजे असा आग्रह धरला जातो. सायंकाळी एक वेळ अन्न घेतल्यास तब्येतीस ते फायदेशीर ठरते. आदिशक्ती ही सर्व विश्वाची जननी आहे. तो धागा पकडून उपासना करायची आहे याची जाणीव लोकांना दिली जाते.
नऊ दिवस उपवासाचे नऊ लाभ
-
वजन नियंत्रण: उपवास केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि भूक कमी लागते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या जास्त खाणे कमी होते.
-
हृदयाचे आरोग्य: अधूनमधून उपवास केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, असे काही अभ्यासांमधून दिसून आले आहे.
-
मेंदूचे कार्य: उपवासामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि संज्ञानात्मक कार्यक्षमतेत वाढ होते, असे मानले जाते.
-
चयापचय सुधारणा: उपवास शरीरातील चयापचय क्रिया सुधारतो आणि पेशींचे आरोग्य वाढवतो.
-
इन्सुलिन संवेदनशीलता: उपवास इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
-
ऑटोफॅजी : उपवासादरम्यान ऑटोफॅजी नावाची प्रक्रिया सुरु होते. यामध्ये खराब, अकार्यक्षम पेशी काढून टाकल्या जातात.ही पेशीय स्वच्छता प्रक्रियां पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढविते.
-
मानसिक आरोग्य: उपवास काळात हल्क अन्न खाल्ल्याने शारिरीक तक्रारी राहत नाहीत. अल्प बोलणे आणि देवाचे नामस्मरण केल्याने चिंता, ताण कमी होऊन मनःस्थितीतील बदल होतो. यामुळे मानसिक आरोग्य सुधारू शकते.
-
डिटोक्सीफिकेशन :उपवासाने शरीराला विश्रांती देऊण आणि जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढून शरीर शुद्ध करण्याचा मार्ग म्हणून उप्वासाचे महतत्व आहे. यामुळे दीर्घ आजाराचा धोका कमी होतो.
-
दोषांचे संतुलन : सलग नऊ दिवस उपवास केल्याने शारीरिक दोष कमी होऊन शारीरिक संतुलन राहण्यास मद्य होते.
नवरात्रीच्या उपवासात पाळायचे नियम :
नियमित मीठ, मांस, अंडी, कांदे आणि लसूण टाळावेत. या ऐवजी सैंधव मीठ वापरावे. दारू, सिगारेट आणि ड्रग्जपासून दूर रहावे. पाणी, दूध आणि ताज्या फळांच्या रसाने शरीराला पाणी द्यावे. लवकर उठून आंघोळ करून आदिशक्ती देवतेची पूजा करावी.
नवरात्र उपवासात कोणता आहार करावा:
-
फळे: ताजी फळे, जसे की सफरचंद, केळी, संत्री, पेरू, डाळिंब (या हंगामात उपलब्ध असणारी फळे)
-
दुग्धजन्य पदार्थ: दूध, दही, पनीर, तूप, मलई आणि खवा
-
पीठ: साबुदाणा, वरीचे तांदूळ.
-
भाज्या: बटाटे, रताळे.
-
इतर: पाणी, लिंबू आणि नारळपाणी.
- ——————————————————————————






