केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने(सीबीएसई) २०२६ च्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा १७ फेब्रुवारी ते १५ जुलै २०२६ दरम्यान देशभर आणि परदेशात घेतल्या जाऊ शकतात. बोर्डाने स्पष्ट केले आहे कि, विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना अभ्यास, शिकवणे आणि परीक्षा व्यवस्था याचे नियोजन करण्यासाठी या तारखांचा उपयोग होईल. या परीक्षा देश आणि विदशातून ४५ लाखाहून अधिक विद्यार्थी देतील.
पुढील वर्षी होणाऱ्या सीबीएसई परीक्षेत सुमारे ४५ लाख विद्यार्थी २०४ विषयाच्या परीक्षा देतील. या परीक्षांना भारतातील विविध राज्याच्या विद्यार्थी बसतील तसेच अन्य देशातील विद्यार्थी देखील परीक्षा देतील. सीबीएसईला मिळालेला जागतिक संपर्क आणि आंतरराष्ट्रीय मान्यता यातून दिसते. बोर्डाने असेही म्हटले आहे की या वेळापत्रकानुसार तयारी करण्यासाठी सर्व विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांमध्ये अधिक समन्वय आवश्यक आहे.
सीबीएसई बोर्डाने आधी अंदाजित तारखांना जाहीर करण्याचा निर्णय विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुविधेसाठी घेतला आहे. हे अंदाजित वेळापत्रक २०२५ च्या इयत्ता ९ आणि ११ वीच्या रजिस्ट्रेशन डेटानुसार तयार केले आहे. बोर्डाने म्हटले आहे की यामुळे विद्यार्थ्यांना यामुळे तयारी करायला पुरेसा वेळ मिळेल आणि ते त्यांची तयारी व्यवस्थित करतील आणि अभ्यासाला देखील त्यांना नीट वेळ देता येईल.
जाहीर केलेल्या तारखामुळे, विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेळापत्रक तयार करण्याची संधी मिळेल. विषयानुसार नीट वेळ ठरवून अभ्यास करता येईल. शाळा देखील त्यांच्या अकादमीक आणि प्रशासकीय कार्य, उदा. परीक्षा संचालन आणि मुल्यांकनासाठी शिक्षकांची योजना आधीच तयार करु शकतील. शिक्षकांना त्यांचे व्यक्तीगत कार्यक्रम आणि सुट्ट्याचे नियोजन करता येईल.
सीबीएसईने स्पष्ट केले आहे की दहावी, बारावी परीक्षेच्या अंतिम तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. अंदाजित वेळापत्रकामुळे विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांना प्रारंभिक रुपरेषा समजण्यात मदत होत असते. बोर्डाने हे स्पष्ट केले की अंतिम निकाल वेळेवर लागण्यासाठी उत्तर पत्रिका तपासणी आणि इतर प्रक्रियाची योजनाबद्ध संचलन करण्यासाठी हे अंदाजित वेळापत्रक उपयोगी ठरणार आहे.