spot_img
बुधवार, सप्टेंबर 24, 2025

9049065657

Homeआंतरराष्ट्रीयगुगलला टक्कर देणार स्वदेशी झोहो

गुगलला टक्कर देणार स्वदेशी झोहो

केंद्रीय मंत्र्यांचं आवाहन : झोहोच्या सेवा आणि योजना जाणून घ्या

नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारत तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबन साधण्यासाठी मोठी पावलं टाकत आहे. सेमीकंडक्टर आणि चिप्सपासून ते स्वदेशी सॉफ्टवेअर पर्यंत विकासावर भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय आयटी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय वापरकर्त्यांना परदेशी सेवांऐवजी स्वदेशी झोहो (Zoho) प्लॅटफॉर्मकडे वळण्याचं आवाहन केलं आहे.

वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर ट्विट करत झोहोचा वापर सुरू केल्याचं सांगितलं. “ डॉक्युमेंट अ‍ॅक्सेस, स्प्रेडशीट्स आणि प्रेझेंटेशनसाठी झोहो वापरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीच्या आवाहनात सामील व्हा,” असं ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अलीकडील जीएसटी बचत महोत्सवाच्या भाषणात देशवासियांना स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांनी सांगितलं की, जीएसटी सुधारणा लागू झाल्यानंतर ग्राहकांना बचत होईल आणि देशी उद्योगांना चालना मिळेल.
झोहो म्हणजे काय ?

झोहो कॉर्पोरेशनची स्थापना १९९६ मध्ये श्रीधर वेम्बू आणि टोनी थॉमस यांनी केली. चेन्नई येथे मुख्यालय असलेली ही सॉफ्टवेअर-अ‍ॅज-अ-सर्व्हिस (SaaS) कंपनी असून तिचा तंत्रज्ञान विकास मोठ्या प्रमाणात तामिळनाडूच्या ग्रामीण भागातूनच होतो. अमेरिकेत नोंदणी असली तरी झोहोची ओळख ‘मेड इन इंडिया’ अशीच आहे. जगभरात झोहोचे १० कोटींहून अधिक वापरकर्ते असून सेवा १५० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहेत.

झोहोकडून मिळणाऱ्या सेवा

झोहो आपल्या Zoho Workplace आणि Zoho Office Suite अंतर्गत अनेक उत्पादकता साधने पुरवते.

  • Zoho Writer ( डॉक्युमेंट तयार व एडिट करण्यासाठी )

  • Zoho Sheet ( स्प्रेडशीट )

  • Zoho Notebook ( नोट्स तयार करण्यासाठी )

  • Zoho WorkDrive ( क्लाऊड स्टोरेज )

  • Zoho Mail ( ईमेल सेवा )

  • Zoho Meeting ( व्हिडिओ कॉन्फरन्सिंग )

  • Zoho Calendar ( कॅलेंडर व्यवस्थापन )

ही लोकप्रिय अॅप्स मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

झोहो काही अॅप्स मोफत देते. उदा. झोहो सीआरएमची तीन वापरकर्त्यांसाठी कायमस्वरूपी मोफत आवृत्ती उपलब्ध आहे. परंतु उर्वरित बहुतेक अॅप्ससाठी सबस्क्रिप्शन आवश्यक आहे. तरीही झोहोचे पेड प्लॅन्स मायक्रोसॉफ्ट ३६५ किंवा गुगल वर्कस्पेसच्या तुलनेत अधिक परवडणारे मानले जातात, ज्यामुळे लहान आणि मध्यम उद्योगांसाठी झोहो हा उत्तम पर्याय ठरतो.

सरकारच्या स्वावलंबी तंत्रज्ञान मोहिमेला झोहोसारख्या स्वदेशी प्लॅटफॉर्ममुळे चालना मिळणार असून मायक्रोसॉफ्ट-गुगलसारख्या जागतिक दिग्गजांना टक्कर देणारा भारतीय पर्याय अधिक मजबूत होणार आहे.

————————————————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments