spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeलाईफ स्टाईलजाड, घनदाट केसांसाठी फायदेशीर तेल

जाड, घनदाट केसांसाठी फायदेशीर तेल

आवळा की भृंगराज ? जाणून घ्या दोन्ही तेलांचे फायदे

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

महिलांचे केस जाड, काळेभोर आणि घनदाट राहावेत, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी अनेकजणी रासायनिक उत्पादनांऐवजी नैसर्गिक उपायांना प्राधान्य देतात. त्यात आवळा तेल (Amla Oil) आणि भृंगराज तेल (Bhringraj Oil) यांचा वापर सर्वाधिक केला जातो. मात्र, कोणते तेल अधिक फायदेशीर ठरेल, याबाबत अनेकदा गोंधळ निर्माण होतो.

आवळा तेलाचे गुणधर्म

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C, खनिजे आणि अमिनो अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात असतात. या पोषणतत्त्वांमुळे केस मजबूत होतात, तुटणे कमी होते तसेच स्कॅल्पवरील खाज आणि कोंड्याची समस्या कमी होते. आवळा तेलाचा नियमित वापर केल्यास केस घनदाट, मजबूत आणि नैसर्गिक चमकदार होतात.

  • वापर पद्धत : तेल हलके गरम करून हलक्या हाताने डोक्याला मसाज करावा. रात्रीभर तेल केसांमध्ये ठेवून सकाळी सौम्य शॅम्पूने धुवावे. केसांमध्ये बदल जाणवण्यासाठी आहारातही आवळ्याचा समावेश करावा.

भृंगराज तेलाचे गुणधर्म

आयुर्वेदात भृंगराजला केसांसाठी अमृत म्हटले जाते. यात असलेले प्रोटीन आणि पोषणतत्त्वे केसांची वाढ वाढवतात, केसगळती कमी करतात आणि मुळे बळकट करतात.

  • वापर पद्धत : भृंगराज तेल हलके गरम करून १५ मिनिटे मसाज करावा. तेल अर्धा तास केसांमध्ये राहू द्यावे आणि नंतर शॅम्पूने धुवावे. दोन-तीन महिन्यांच्या नियमित वापराने लक्षणीय परिणाम दिसू शकतात.

कोणते तेल अधिक उपयुक्त ?
तज्ज्ञांच्या मते, दोन्ही तेलांचे गुण वेगवेगळे आहेत.
  • भृंगराज तेल : केसगळती कमी करून नवीन केस उगवण्यास मदत करते.
  • आवळा तेल : केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकवून त्यांना घनदाट आणि चमकदार बनवते.
एकत्रित वापरही फायदेशीर

आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की, आवळा आणि भृंगराज तेल एकत्र मिसळून वापरल्यास दोन्हींचे फायदे एकाच वेळी मिळतात. नियमित मसाज केल्यास टाळूतील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांचे आरोग्य सर्वांगीण रित्या बळकट होते.

केसांच्या समस्येनुसार योग्य तेल निवडावे. केसगळतीची समस्या असल्यास भृंगराज तेल, तर अकाली पांढरे होणे किंवा चमक वाढवायची असल्यास आवळा तेल उपयुक्त ठरते. दोन्हींचा एकत्रित वापर केल्यास केसांची वाढ आणि घनता दोन्हीही वाढू शकतात.
————————————————————————————————————————-
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments