मराठी रंगभूमीला विकी काैशलचा सलाम !

मराठीतून दिला संदेश : तुमचे पुढचे शो हाऊसफुल्ल होणार

0
87
Vicky Kaushal has specially brought glory to the play Shivaji Underground in Bhimnagar Mohalla, which is currently a huge hit on the stage, in Marathi.
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

महाराष्ट्राची समृद्ध नाट्यपरंपरा पुन्हा एकदा हिंदी सिनेसृष्टीला भुरळ घालत आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी देवबाभळी या संगीत नाटकाचे मनापासून कौतुक करत मराठी रंगभूमीला सलाम केला होता. नाट्यसंस्कृतीतील विषयवैविध्य, कलाकारांचा अभिनय आणि सामाजिक जाणीव याबद्दल त्यांनी भरभरून प्रशंसा केली. यापूर्वी नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही मराठी नाटकाचे गुणगान गायले आहे.

आता या यादीत बॉलिवूडचा तरुण स्टार विकी कौशलचे नावही झळकत आहे. सध्या रंगभूमीवर प्रचंड गाजत असलेल्या शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचा विकीने खास मराठीतून गौरव केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “ नमस्कार, मी विकी कौशल. ‘ शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला ’ या नाटकाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा. तुम्ही जे काम करताय, महाराजांचा विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न करताय, ती खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. तुमचे पुढचे शो हाऊसफुल्ल झाल्याशिवाय राहणार नाहीत, हीच माझी शुभेच्छा. जय भवानी, जय शिवराय ! ”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार्वत्रिक आणि मानवतेसाठी केलेल्या संघर्षावर आधारित हे नाटक प्रेक्षकांच्या हृदयात घर करत आहे. काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेले हे नाटक काही कारणांमुळे बंद झाले होते; मात्र आता पुन्हा नव्या जोमानं सुरू झालं आहे. लेखक राजकुमार तांगडे आणि दिग्दर्शक कैलाश वाघमारे यांच्या कुशलतेतून साकारलेलं हे नाटक फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर बॉलिवूड कलाकारांनाही आकर्षित करत आहे.

मराठी रंगभूमीच्या या सलग गौरवामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बॉलिवूडमधील नामवंत कलाकारांचं असं मनापासूनचं कौतुक मराठी नाट्यजगतासाठी निश्चितच मोठं बळ ठरत आहे.
————————————————————————————————-
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here