सर्वात मोठ्या क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन

0
102
Dignitaries at the inauguration of state-of-the-art cruise terminal in Mumbai
Google search engine

मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज 

मुंबईत जगातील सर्वात मोठं आणि अत्याधुनिक अशा प्रकारचं क्रूझ टर्मिनल उभारण्यात आलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत, इंदिरा डॉक परिसरात मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलची उभारणी पूर्ण झाली आहे. या क्रूज टर्मिनलवर  एकाचवेळी ५ मोठी जहाजे उभी राहतील. येथे ७२ चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत. १० लाख प्रवासी क्षमता आहे. 

एमआयसीटी हे भारतातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे क्रूझ टर्मिनल आहे. या क्रूज टर्मिनलच्या पहिले दोन मजले २०७,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहेत. येथे ७२ चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर येथून या टर्मिनलचे व्हर्च्युअल उद्घाटन केले.  नव्याने बांधलेले एमआयसीटी दरवर्षी अंदाजे १० लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेल्या पद्धतीने डिझाइन केले आहे. हे टर्मिनल भारतातील समुद्री पर्यटनाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल मानलं जात आहे.
A grand terminal built in Mumbai
या भव्य टर्मिनलवर एकाचवेळी पाच मोठ्या क्रूझ जहाजांना थांबण्याची सुविधा उपलब्ध असून, जागतिक दर्जाच्या प्रवासी सेवांसह ही सुविधा सज्ज करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी येथे सर्व आधुनिक आणि आवश्यक सुविधा देण्यात आल्या असून, आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या वाढीसाठी हे एक प्रमुख केंद्र ठरणार आहे.
या क्रूज टर्मिनलवर एकाच वेळी पाच जहाजे उभी राहू शकतात. पार्किंगमध्ये एकाच वेळी 300 हून अधिक वाहने पार्क केली जाऊ शकतात. एमआयसीटी प्रकल्पात एकूण 556 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. एमआयसीटीची रचना लहरी छताने करण्यात आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे बांधकाम २०१८ मध्ये सुरू झाले. ते अंदाजे ४.१५ लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे. या टर्मिनलमध्ये २२ लिफ्ट, १० एस्केलेटर आहेत. विशेष म्हणजे हे टर्मिनल एका वेळी २ मोठ्या क्रूझ जहाजांना सहजपणे हाताळू शकते. या क्रूज टर्मिनलचे डिजाईन अतिशय भव्य आणि सुंदर आहे. याचे प्रवेशद्वार  मुंबईच्या वारशापासून प्रेरणा घेत असल्याचे दिसून येते. याच्या छताचा आकार या समुद्राच्या लाटांप्रमाणे आहे. येथे प्रवाशांसाठी खास आसन व्यवस्था तसेच सेल्फी पॉइंट्स  असणार आहे.

——————

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here