नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटा ( Meta ) ने त्यांच्या नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज ‘मेटा रे-बॅन डिस्प्ले स्मार्ट ग्लास’ लॉन्च केले आहे. हा चष्मा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( AI ) च्या मदतीने व्हर्च्युअल आणि वास्तविक जगातील अंतर कमी करतो. तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, भविष्यात लोकांना काय खरे आहे आणि काय आभासी आहे, हे ओळखणेही कठीण होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
या स्मार्ट चष्म्याच्या साहाय्याने वापरकर्ते हवेत बोटे फिरवून मेसेजेस पाहू शकतात, फोटो बघू शकतात आणि अनेक डिजिटल क्रियाकलाप पार पाडू शकतात. चष्म्यामध्ये इनबिल्ट स्क्रीन असून, वापरकर्ते फोनसारखे मेसेज, फोटो आणि इतर माहिती पाहू शकतात. तसेच, हा चष्मा ‘न्यूरल बँड’ नावाच्या सेंसर-पॅक ब्रेसलेटसोबत येतो, ज्यामुळे फक्त हाताच्या हलक्या हालचालींनी चष्मा नियंत्रित करता येतो. यामुळे फोन वापरल्याशिवायच मेसेज पाठवणे, कॉल करणे अशा क्रियांचा अनुभव घेता येईल.
स्मार्ट चष्म्याची खास वैशिष्ट्ये
-
पूर्ण चार्ज केलेल्या केससह 36 तासांची बॅटरी लाइफ; एका चार्जवर 4 तास चालणार
-
हाय डेफिनेशन (HD) फोटो आणि व्हिडीओसाठी 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा
-
दोन ओपन-इयर स्पीकर
-
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसोबत मायक्रोफोन
-
32 जीबी फ्लॅश स्टोरेज