spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

HomeUncategorizedपोषणमूल्याने समृद्ध फळ : खजूर

पोषणमूल्याने समृद्ध फळ : खजूर

कोल्हापूर ; प्रसारमाध्यम न्यूज 

खजूर जास्त करून नवरात्रोत्सवात खाल्ले जाते. खजूर (Dates) हे एक पोषणमूल्याने समृद्ध असे फळ आहे. नऊ दिवस उपवास करणाऱ्या भक्तांना खजुराचा खूप आधार असतो. खजूर वर्षभर बाजारात उपलब्ध असते. शरीरास ऊर्जा देणारे आणि औषधी गुणधर्म असल्यामुळे खजुराचा आहारात उपयोग एरवीही केला जातो. खजूर प्राचीन काळापासून आहाराचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.

खजूर प्रामुख्याने उष्णकटिबंधीय आणि वाळवंटी भागांत पिकते. खजूर विशेषतः मध्यपूर्व आफ्रिका आणि दक्षिण आशियात जास्त पिकते. इजिप्त हा सर्वाधिक खजूर उत्पादन करणारा देश आहे.  याशिवायसौदी अरेबिया, इराण, इराक, अल्जेरिया आणि ट्युनिशिया या देशातही खजुराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. अमेरिका (कॅलिफोर्निया), ऑस्ट्रेलिया, मोरोक्को, स्पेन आणि त्रिनिदाद येथेही खजुराची लागवड केली जाते. भारतात राजस्थान, गुजरात (कच्छ), पंजाब, हरियाणा या राज्यात खजुराचे उत्पादन घेतले जाते. 

 खजूराचे प्रकार:

खजूराचे विविध प्रकार असतात. त्यातील काही प्रसिद्ध प्रकार:
प्रकाराचे नाव
वैशिष्ट्य
मेजदूल
मोठा, गोडसर, मऊ
अजवा 
काळसर, सौम्य गोड
दिग्लात नूर 
अर्धगोड, सुकटलेला प्रकार
खदरी 
काळसर, किंचित कुरकुरीत
सुक्करी )
अतिशय गोड, मऊ

खजूराची पोषणमूल्ये (१०० ग्रॅममध्ये अंदाजे):

  • ऊर्जा (कॅलोरी): २७७ कॅलरी
  • कार्बोहायड्रेट्स: ७५ ग्रॅम (त्यात साखर सुमारे ६३ ग्रॅम)
  • फायबर्स: ७ ग्रॅम
  • प्रथिने: २ ग्रॅम
  • फॅट: नगण्य (०.१५ ग्रॅम)
  • कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न, व्हिटॅमिन B6 इ. मुबलक प्रमाणात असतात.

 खजूराचे आरोग्यदायी फायदे:

ऊर्जा वाढवतो: खजूर हा नैसर्गिक साखरेचा उत्तम स्रोत आहे – ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज़. त्यामुळे तो थकवा दूर करून ऊर्जा देतो.
 पचनासाठी फायदेशीर: त्यातील फायबर्समुळे पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठतेवर उपयोगी ठरतो.
हृदयासाठी हितकारक: पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे खजुरात भरपूर असून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
रक्तवाढीसाठी उपयुक्त: खजुरातील लोह (Iron) हे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते, म्हणूनच अ‍ॅनिमिया (anemia) असणाऱ्यांना उपयुक्त आहे.
हाडांची मजबुती: कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियममुळे हाडांना बळकटी मिळते.
मेंदूच्या आरोग्यासाठी: त्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि बी-ग्रुप जीवनसत्वांमुळे मेंदूचे आरोग्य सुधारते.

भारतात मुख्यतः सुकवलेले खजूर (dry dates) जास्त वापरले जातात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. संस्कृत; तसेच हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे म्हणतात. खजूर लवकर आंबू लागतो, म्हणून खजुराची फळे कडक उन्हात सुकवतात. खजूर सुकवताना त्याचे ३५ टक्के वजन कमी होते. आपण जे खजूर खातो ते सुकवलेले असतात.

 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments