spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeमनोरंजनराज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( SCERT ), महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या पीएम-ई-विद्या ’ उपक्रमाअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये २०० शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्यात आल्या असून त्यापैकी वाहिन्या महाराष्ट्रासाठी विशेष उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांमुळे इयत्ता पहिली ते  दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.

इयत्तेनुसार वाहिन्यांचे वाटप

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या वाहिन्यांची विभागणी करण्यात आली आहे. त्या पुढीलप्रमाणे

  •  SCERTM C ११३ – इयत्ता १ ली आणि ६ वी
  •  SCERTM C ११४ – इयत्ता २ री आणि ७ वी
  •  SCERTM C ११५ – इयत्ता ३ री आणि ८ वी
  •  SCERTM C ११६ – इयत्ता ४ थी आणि ९ वी
  •  SCERTM C ११७ – इयत्ता ५ वी आणि १० वी

या विभागणीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या इयत्तेनुसार अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक कार्यक्रम सहज उपलब्ध होणार आहेत.

शिक्षण पोहोचवण्याचा प्रभावी मार्ग
  • या वाहिन्या DD-Free Dish वर आणि YouTube वर लाईव्ह पाहता येतील.

  • प्रत्येक वाहिनीवर दररोज ६ तासांचे नवे शैक्षणिक कार्यक्रम दाखवले जातील.

  • हे कार्यक्रम दिवसभरात ३ वेळा पुन्हा प्रसारित केले जातील, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार अभ्यास करण्याची संधी मिळेल.

तज्ज्ञ समित्यांद्वारे मार्गदर्शन

राज्यस्तरावर आणि प्रत्येक वाहिनीसाठी तज्ज्ञांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कार्यक्रमांची गुणवत्ता, वेळापत्रक आणि त्यांचा जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोच सुनिश्चित करेल.

पीएम-ई-विद्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे सामर्थ्य अनुभवायला मिळत आहे. हे पाऊल ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी कमी करून प्रत्येक मुलापर्यंत ज्ञान पोहोचवत आहे. या वाहिन्यांद्वारे अभ्यासक्रमाशी थेट निगडित तसेच मुख्य प्रवाहातील सर्व शालेय विषयांसाठी दर्जेदार व्हिडिओ सामग्री उपलब्ध होत असून, विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला गती मिळत आहे. शिक्षकांसाठीही हे एक प्रभावी शैक्षणिक साधन ठरत असून, शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावण्यास मदत होत आहे.

SCERT महाराष्ट्राचे संचालक राहुल रेखावार यांनी सर्व शिक्षक, अधिकारी आणि पालकांना आवाहन केले आहे की त्यांनी या ‘पीएम-ई-विद्या’ वाहिन्या YouTube वर सबस्क्राइब कराव्यात. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणातील दरी कमी होईल आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रभावी साधन मिळेल.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments