spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeराजकीयतरुणांच्या ऊर्जेचा सकारात्मक वापर करणार

तरुणांच्या ऊर्जेचा सकारात्मक वापर करणार

विश्वजीत पवार : कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

तरुणांच्या आजच्या ऊर्जेचा योग्य आणि सकारात्मक वापर करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नवा भारत घडविण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, असे प्रतिपादन विश्वजीत पवार यांनी केले. भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते विश्वजीत भरत पवार यांना निवडीचे पत्र देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार धनंजय महाडिक आणि भाजपा सचिव महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना युवक नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

यावेळी पुढे बोलताना विश्वजीत पवार म्हणाले, “ आजच्या काळात युवकांकडे असलेली ऊर्जा ही समाजासाठी मोठी ताकद आहे. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास युवक शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार, पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. ”

निवडीच्या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी विश्वजीत पवार यांचे अभिनंदन करत त्यांना संघटनेचे ध्येय आणि अपेक्षा समजावून सांगितल्या. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार धनंजय महाडिक आणि भाजपा सचिव महेश जाधव यांनीही युवकांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

या निवडीमुळे कोल्हापूर महानगरातील युवक संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली समाजासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

——————————————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments